शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक नियमभंग करताना सावधान!

By admin | Updated: September 6, 2014 01:24 IST

पणजी : एखाद्या ठिकाणी वाहतूक पोलीस उपलब्ध नसला तरी फेसबुक, वॉट्स अ‍ॅप यासारख्या सोशल नेटवर्किंग साईट्समुळे वाहतूक नियमभंगाचे प्रकार उघड होत आहेत.

पणजी : एखाद्या ठिकाणी वाहतूक पोलीस उपलब्ध नसला तरी फेसबुक, वॉट्स अ‍ॅप यासारख्या सोशल नेटवर्किंग साईट्समुळे वाहतूक नियमभंगाचे प्रकार उघड होत आहेत. अशा प्रकारांची दखल घेऊन गेल्या आठ महिन्यांत सातजणांना पोलिसांच्या वाहतूक विभागाने चलन दिले आहे. छायाचित्रांसह सोशल नेटवर्किंग साईट्सवरून ज्या तक्रारी येतात, त्यांची दखल पोलिसांचा वाहतूक विभाग घेतो. जर कुणी व्यवस्थित वाहन पार्क केलेले नसेल किंवा जर कुणी नो-पार्किंग क्षेत्रात आणून वाहन ठेवलेले असेल, तर त्याचे छायाचित्र मोबाईलवरून टिपून लोक फेसबुक व वॉट्स अ‍ॅपवर टाकतात. या छायाचित्रांची पोलिसांचा वाहतूक विभाग लवकर दखल घेतो. गेल्या वर्षी अशा प्रकारच्या छायाचित्रांच्या आधारे पंधराजणांना चलन देण्यात आले, तर यंदा आतापर्यंत सातजणांना चलन दिले गेले आहे, अशी माहिती मिळाली. फेसबुकवर पोलिसांच्या वाहतूक विभागाने स्वतंत्र पेज तयार केले आहे. त्या पेजवर जी छायाचित्रे पोस्ट केली जातात, त्यांची दखल घेतली जाते. ज्या वाहनधारकाने नियमभंग केला आहे, त्यास ठरावीक दिवसांत दंड भरण्यास सांगितले जाते व चलनसाठी जर कुणी प्रतिसाद दिला नाही, तर तो विषय मग न्यायालयाकडे सोपविला जातो. यामुळे एखाद्या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने वाहतूक नियमांचा भंग करायला आपण मोकळे आहोत, असे वाहनधारकांना मानता येणार नाही. विविध शहरांमध्ये कॅमेरेही आहेत. कॅमेऱ्यांद्वारेही वाहतूक नियमभंगाचे प्रकार टिपले जातात. दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या विभागाप्रमाणेच सरकारच्या वाहतूक खात्याकडेही फेसबुक किंवा वॉट्स अ‍ॅपद्वारे आलेल्या तक्रारींची दखल घेण्याची व्यवस्था आहे का, अशी विचारणा या प्रतिनिधीने वाहतूक संचालक अरुण देसाई यांच्याकडे केली असता, त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. आम्ही फक्त एसएमएसद्वारे आलेल्या तक्रारींची दखल घेतो व त्यानुसार कारवाई करतो. आॅनलाईन तक्रार सेवेची नियमितपणे देखरेख केली जाते, असे त्यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)