शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
3
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
4
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
5
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
6
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
7
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
8
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
9
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
10
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
11
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
12
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
13
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
14
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
15
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
16
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
17
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
18
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
19
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
20
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा होणार पेपरलेस

By admin | Updated: July 20, 2014 01:40 IST

पणजी : कागदविरहित विधानसभा अधिवेशनाच्या संकल्पनेला आमदारांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता, पावसाळी अधिवेशन ९५ टक्के पेपरलेस होणार

पणजी : कागदविरहित विधानसभा अधिवेशनाच्या संकल्पनेला आमदारांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता, पावसाळी अधिवेशन ९५ टक्के पेपरलेस होणार असल्याचा विश्वास सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री आमदार दिगंबर कामत यांनी आपले १०० टक्के प्रश्न, तर आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सर्वाधिक प्रश्न आॅनलाईन पद्धतीने पाठविले आहेत. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २२ जुलै ते २१ आॅगस्ट या दरम्यान होणार असून २१ दिवसांच्या या अधिवेशनासाठी आतापर्यंत ७२० तारांकित, तर १२८० अतारांकित प्रश्न आले आहेत. १११८ प्रश्न हे आॅनलाईन पद्धतीने आले आहेत. प्रत्येक आमदाराला त्याच्या नावाचे लॉग इन व पासवर्ड देण्यात आला आहे. त्याद्वारे आपला प्रश्न ते आॅनलाईन पद्धतीने थेट सभापतींना विचारू शकतात. त्यामुळे आता बॅलट पेपरमध्ये प्रश्न टाकण्याची गरज राहिलेली नाही. या आॅनलाईन सुविधेच्या पहिल्या मॉड्युलचा जास्तीत जास्त वापर हा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, दिगंबर कामत व गणेश गावकर यांनी केला असून त्यांनी सर्वांत अधिक प्रश्न विचारले आहेत. आॅनलाईन पद्धतीने प्रश्न विचारण्यासाठी तसेच उत्तरे पाहण्यासाठी आमदारांना प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती सभापतींकडून देण्यात आली. विधानसभा सदस्यांना लॅपटॉप पुरविण्यात आले असून ते सर्व्हरद्वारे जोडण्यात येतील. तसेच आमदारांना देण्यात आलेले टॅबलेटही ते वापरू शकतील, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)