शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात ‘असहकारासन’

By admin | Updated: July 7, 2015 01:56 IST

मडगाव : पोर्तुगाल किंवा अन्य युरोपियन देशांत जाऊन शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना सध्या व्हिसांची प्रमाणीकरण प्रक्रिया पार पाडताना

मडगाव : पोर्तुगाल किंवा अन्य युरोपियन देशांत जाऊन शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांना सध्या व्हिसांची प्रमाणीकरण प्रक्रिया पार पाडताना जणू अग्निदिव्यातूनच जावे लागत आहे. या व्हिसांचे प्रमाणीकरण (अटेस्टेशन) करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात लोकांची झुंबड उडत असून याचा विपरीत परिणाम पोर्तुगालात सांजियन व्हिसावर शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर होऊ लागला आहे. या प्रमाणीकरणासाठी दर पानामागे ५00 रुपये शुल्क आकारले जात असल्याने विद्यार्थ्यांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे आडमुठे धोरण पाहून ‘नकोच ते युरोपातील शिक्षण’ असे म्हणण्याची पाळी विद्यार्थ्यांवर येऊ लागली आहे.पोर्तुगालात जाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हिसाचे प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. सासष्टीतून पोर्तुगालात जाणाऱ्या लोकांची संख्या बऱ्याच मोठ्या प्रमाणावर असून दरदिवशी सरासरी ५0 ते ६0 अर्ज या प्रमाणीकरणासाठी येत असतात. अशातच हा विभाग सांभाळणारे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत तावडे यांच्याकडे मडगाव पालिकेचाही ताबा असल्याने हे अर्ज पडून राहू लागले आहेत. त्यामुळे एकूणच या विभागात एकप्रकारचा खेळखंडोबा झाला आहे. या साऱ्या प्रक्रियेत शिक्षणासाठी पोर्तुगाल व युरोपातील इतर देशांत जाऊ पाहाणाऱ्या विद्यार्थ्यांची गोची होऊ लागली आहे.फक्त अर्ज पडून राहातात अशातलीच गोष्ट नव्हे, तर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडूनही अडवणुकीचे धोरण राबविले जात आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पार करणे म्हणजे मोठे दिव्य असल्याची प्रतिक्रिया आसावरी या एका विद्यार्थिनीने ‘लोकमत’च्या या प्रतिनिधीकडे व्यक्त केली. या विद्यार्थिनीला आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप प्राप्त झाली असून सांजियन व्हिसावर ती पोर्तुगालला जाणार आहे. त्यासाठी आपले व्हिसाचे अर्ज घेऊन प्रमाणीकरणासाठी ती जिल्हाधिकारी कार्यालयात गेली असता, या विभागातील कर्मचारी असलेल्या अश्विनी जोशी यांनी तिचा अर्जच स्वीकारण्यास नकार दिला. अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात नाहीत. त्यांच्याकडे मडगाव पालिकेचा ताबा आहे, असे तिला सांगण्यात आले. शेवटी मडगाव पालिकेत येऊन तिला हे प्रमाणीकरणाचे सोपस्कार पूर्ण करावे लागले. यापूर्वी पोलीस क्लिअरन्स मिळविण्यासाठी दिलेला अर्जही असाच पडून राहिला होता. त्याशिवाय या कागदपत्रांचे पोर्तुगीज भाषेत अनुवादन करण्याची प्रक्रियाही वेळकाढू असल्याचे तिने सांगितले.ही प्रक्रिया पार पाडताना दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या अडवणुकीच्या धोरणाचाही तिला जाच सहन करावा लागला. या अर्जाची एंट्री तिने तळमजल्यावरील कक्षात दिली असता, या एंट्रीचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थिनीने स्वत: आपण हा अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे देते असे सांगितले असता, या कक्षातील मीलन चिपकर या महिला कर्मचाऱ्याने तुम्हाला असा अर्ज घेऊन जाता येत नाही, असे तिला सांगितले. ही शुद्ध अडवणूक होती, असे ती विद्यार्थिनी म्हणाली.या संदर्भात तावडे यांच्याशी संपर्क साधला असता, दर दिवशी अशाप्रकारचे ६0 ते ७0 अर्ज प्रमाणीकरणासाठी येत असतात. या अर्जांवर सह्या करण्यासाठीच अर्धा दिवस जातो. हे अर्ज देणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच ते हातावेगळे करण्यास विलंब होतो, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)