शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोहत्याबंदी कायदा अल्पसंख्याकविरोधी

By admin | Updated: March 10, 2015 01:36 IST

पणजी : गुजरात आणि महाराष्ट्रात गोहत्याबंदी कायदा लागू करण्यात आल्यानंतर आता तो देशातील सर्व भाजप शासित राज्यांत

पणजी : गुजरात आणि महाराष्ट्रात गोहत्याबंदी कायदा लागू करण्यात आल्यानंतर आता तो देशातील सर्व भाजप शासित राज्यांत लागू करण्याचा विडा केंद्र सरकारने उचलला असून हा निर्णय ख्रिस्ती आणि मुस्लिम समाजाच्या हिताविरुद्ध असल्याचा आरोप कॉँग्रेसने केला आहे. कॉँग्रेसचे प्रवक्ते आग्नेल फर्नांडिस यांनी कॉँग्रेस हाउसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले, की गोहत्याबंदी सर्व राज्यांत लागू करण्यासाठी पंतप्रधानांच्या कार्यालयातून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. गोमांसाच्या व्यवसायात असलेल्या अल्पसंख्याक समाजातील गरीब लोकांच्या पोटापाण्यावर यामुळे गदा येणार आहे. त्यामुळे हा निर्णय अल्पसंख्याकांच्या विरोधात आहे. भाजप हिंदुराष्ट्राचा अजेंडा पुढे नेत असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचा आरोप त्यांनी केला. गोव्यात गोहत्याबंदी कायदा लागू आहे; परंतु या कायद्याचा दुरुपयोग करून मांसाच्या व्यवहारात असलेल्या लोकांची आर्थिक गोची करण्यात आली आहे. गोवा मांस प्रकल्पातही प्रकल्पाचे अधिकारी आणि डॉक्टर यांच्यापेक्षा भाजपशी संबंध असलेल्या एका बिगर सरकारी संस्थेचा मोठा दबदबा आहे. त्यामुळेच हा प्रकल्प बंद स्थितीत आहे, असे त्यांनी सांगितले. गोवा पोलिसांना त्यांच्या आणीबाणीच्या आणि अथक सेवेसाठी १३ पगार देण्याची पद्धत आहे. डिसेंबर महिना संपल्यानंतर हा पगार देण्यात येतो. आता पहिल्यांदाच तीन महिने हा पगार अडला आहे. त्यासाठी भाजप सरकारला कॉँग्रेसचे प्रवक्ते सुनील कवठणकर यांनी जबाबदार धरले आहे. पहिल्यांदाच पोलिसांचा १३वा पगार हा इतका मोठा काळ अडला आहे. सरकारला पोलिसांच्या समस्यांचे सोयरसुतक नाही. प्रशासनाच्या बाबतीतही हीच स्थिती आहे. त्यामुळे अराजकता माजल्याचा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)