शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

दिगंबरांवर आणखी एक गुन्हा

By admin | Updated: August 17, 2015 01:36 IST

पणजी : लुईस बर्जर-जैका लाचखोरी प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा भारतीय दंडसंहिता कलम

पणजी : लुईस बर्जर-जैका लाचखोरी प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा भारतीय दंडसंहिता कलम २०१ अन्वये नोंद केला आहे. मडगावचे नगराध्यक्ष आर्थूर डिसिल्वा आणि जैकाचे सर्वेक्षण अधिकारी उदयकुमार मांडेवलकर यांच्यावर कामत यांना साथ देण्याचा ठपका ठेवून गुन्हा नोंद केला आहे. या दोघांना अटक होण्याचीही शक्यता आहे. जैका लाचखोरी प्रकरणी नोंदवलेल्या गुन्ह्यात आणखी कलमे वाढविली आहेत. तसेच संशयितही वाढले आहेत. कामत यांनी माहिती हक्क कायद्याखाली (आरटीआय) मागितलेली माहिती जैकाचे सर्वेक्षण अधिकारी आणि माहिती हक्क अधिकारी उदयकुमार मांडेवलकर यांनी चुकीची दिली होती. जैका प्रकरणात पोलिसांना हवी असलेली फाईल क्राईम ब्रँचकडे असल्याचे उत्तर त्यांनी कामत यांना दिले होते. हे उत्तर त्यांनी कामत यांच्या दबावामुळे दिल्याचा क्राईम ब्रँचचा दावा आहे. आरटीआयखाली मागितलेली ही माहिती नेण्यासाठी मडगावचे नगराध्यक्ष आर्थूर डिसिल्वा आले होते. त्यांना ही माहिती मांडेवलकर यांच्याकडून दिली होती. त्यामुळे या प्रकरणात मांडेवलकर आणि डिसिल्वा यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेचीही शक्यता व्यक्त होत आहे. भारतीय दंड संहिता कलम २०१ हे पुरवा नष्ट करण्याच्या संदर्भात लावले जाते. हा गुन्हा सिद्ध झाल्यास किमान दहा वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. खून, दरोडे याबाबतच्या गुन्ह्यांत हे कलम लावले तर मोठी शिक्षा आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत लावले आणि गुन्हा सिद्ध झाला तर कमी शिक्षा दिली जाते. लुईस बर्जर प्रकरणात हे कलम आरटीआयखाली मागितलेल्या माहितीवरून आणि त्यासाठी दिलेल्या उत्तराचा आधार घेऊन लावले आहे. (प्रतिनिधी)