शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना इफेक्ट: बोंडला अभयारण्यातील प्राणी सध्या गोमांसाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 16:32 IST

कत्तलखाना बंद असल्याने गोमांस मिळणं अवघड

पणजी : बोंडला अभयारण्यातील प्राण्यांची काळजी घेणे, त्यांची देखभाल करणे ही कामे सरकारच्या वन खात्याने सुरूच ठेवली आहेत. मात्र अभयारण्यातील काही प्राण्यांना दर आठवड्याला जे गोमांस पूर्वी मिळत होते, त्याचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे सध्या प्राण्यांना गोमांसाची चव चाखता येत नाही, असे खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.राज्यातील अन्य अभयारण्यांप्रमाणोच बोंडला अभयारण्य लोकांसाठी यापूर्वीच बंद केले गेले आहे. बोंडला प्राणी संग्रहालयाला एरव्ही देश- विदेशातील बरेच पर्यटक भेट देत होते. तिथे सध्या प्राण्यांची संख्या कमी असली तरी, वाघ, बिबटे, अस्वल, साळी, हत्ती, गवेरेडे आदी प्राणी तसेच अजगर व अन्य साप आहेतच. वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी विकास देसाई यांनी सोमवारी लोकमतला सांगितले, की प्राण्यांसाठी रोज वेगवेगळा आहार ठरलेला असतो. तो पुरविण्याचे काम वन खाते करते. लॉक डाऊनच्या काळातही आहार पुरविला जात आहे पण आम्ही सध्या बीफचा पुरवठा करू शकत नाही. कत्तलखाना बंद असल्याने गोमांस उपलब्ध होत नाही. मात्र चिकन, मटण आदी आहार पुरविला जात आहे.काही प्राण्यांना आठवडय़ातून एकदा गोमांस पुरविले जात होते. रोज एकच आहार ठेवला जात नाही. वेगवेगळा आहार पुरवून प्राण्यांना जगविले जाते. गोवा फलोत्पादन विकास महामंडळाची दालने व अन्य ठिकाणहूनही काही माल आणून तो बोंडला अभयारण्यातील काही प्राण्यांना आहाराच्या रुपात पुरविला जात आहे. त्या कामात खंड पडलेला नाही.दरम्यान, देसाई यांनी सांगितले की म्हादई अभयारण्यात लावलेल्या कॅमेऱ्यांचे कामही लॉक डाऊनच्या काळात सुरू आहे. कॅमेऱ्यांमध्ये विविध प्राणी टिपले गेले आहेत. पट्टेरी वाघ मात्र नव्याने दिसून आला नाही. वन खात्याचे रक्षकही अभयारण्यावर लक्ष ठेवून आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या