शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

अनंत शेट यांनाच मंत्रिपद

By admin | Updated: July 10, 2015 01:39 IST

मये मतदारसंघाचे आमदार तथा उपसभापती अनंत शेट यांना मंत्रिपद देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे डिचोली तालुक्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळणार आहे.

सद्गुरू पाटील ल्ल पणजीमये मतदारसंघाचे आमदार तथा उपसभापती अनंत शेट यांना मंत्रिपद देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे डिचोली तालुक्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळणार आहे.विधानसभा अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करावा की नाही, हे निश्चित ठरलेले नाही; पण गणेश चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार निश्चितच होईल, असे संकेत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिले आहेत. अनंत शेट हे भाजपचे ज्येष्ठ आमदार आहेत. त्यामुळेच त्यांचे नाव मंत्रिपदासाठी निवडले आहे. साखळीचे आमदार प्रमोद सावंत किंवा सांत आंद्रेचे आमदार विष्णू वाघ यांना मंत्रिपद द्यावे, याविषयीची प्रश्नार्थक चर्चा गेल्या महिन्यात भाजपमध्ये होती. मात्र, ती दोन्ही नावे बाजूला ठेवून शेट यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सावंत व वाघ हे प्रथमच निवडून आलेले आमदार आहेत. नीलेश काब्राल, गणेश गावकर, सुभाष फळदेसाई, ग्लेन टिकलो, किरण कांदोळकर, मायकल लोबो, सुभाष ऊर्फ राजन नाईकही भाजपचे प्रथमच २०१२ साली निवडून आलेले आमदार आहेत. डिचोली तालुक्यात डिचोलीसह साखळी व मये मतदारसंघ येतात; पण डिचोली तालुक्याला भाजपच्या मंत्रिमंडळात सध्या प्रतिनिधित्व नाही. तीनपैकी दोन विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. डिचोली मतदारसंघ हा अपक्ष आमदार नरेश सावळ यांच्याकडे आहे. डिचोलीच्या अगदी शेजारील सत्तरी तालुक्यातील दोन्ही मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने सत्तरीला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळण्याचा प्रश्नच येत नाही. शेट सध्या उपसभापती आहेत. त्यांना मंत्रिपद दिल्यानंतर वाघ किंवा सावंत यांना उपसभापतीपद दिले जाऊ शकते. तुरुंगात असलेले गोवा विकास पक्षाचे नुवेचे आमदार मिकी पाशेको यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर मंत्रिमंडळात एक जागा रिकामी झाली.