शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहाने वेलिंगकरना भेटायला हवे होते - नाना बेहरे

By admin | Updated: September 12, 2016 22:06 IST

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सुभाष वेलिंगकर याना भेटायला हवे होते आणि परिस्थिती समजून घ्यायला हवी होती.

ऑनलाइन लोकमत 
पणजी, दि. १२ -  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सुभाष वेलिंगकर याना भेटायला हवे होते आणि परिस्थिती समजून घ्यायला हवी होती असे स्पष्ट शब्दात नाना बेहरे यांनी भाजपची चूक दाखवून दिली आहे.  वेलिंगकर यांनी आपले १०० टक्के जीवन संघ कामासाठी दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 
एका इंग्रजी वृत्त संस्थेशी बोलताना बेहरे यांनी वेलिंगकर यांना संघचालक पदावरून कमी करण्याच्या घटनेमुळे आपल्याला दु:ख झाले असल्याचे सांगितले. निदर्शकांनी अमित शहा यांच्याविरोधात निदर्शने केली नव्हती. त्यांचा रोष होता गोवा भाजपवर. परंतु निदर्शकांना भेटून शहा यांनी माहिती घ्यायला हवी होती. वेलिंगकर यांनाही भेटायला हवे होते. त्यामुळे कधाचित संघ आणि भाजपमधील रुंदावलेली दरीही कमी झाली असती असे ते म्हणाले. 
वेलिंगकर यांना संघचालक पदावरून कमी केल्यानंतर गोव्यातील संघाने कोंकण प्रांताशी फारकत घेतल्यानंतर गोवा विभागाचे संघचालक म्हणून बेहरे यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. नवीन संघ आणि जुना संघ असे काहीच नाही. गोव्यात संघाचे काम करणारे सर्वच जण स्वयंसेवक आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. माद्यम प्रश्नी त्यांचा पाठिंबा चालू राहणार आहे आणि वेलिंगकर यांची भेटही ते घेणार आहेत असे त्यांनी सांगितले.