शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पाण्याची पर्यायी व्यवस्था

By admin | Updated: November 24, 2015 01:28 IST

डिचोली/पणजी : तिळारीच्या कालव्यामधून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे; पण सरकारने चांदेल व अस्नोडा पाणीपुरवठा

डिचोली/पणजी : तिळारीच्या कालव्यामधून होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे; पण सरकारने चांदेल व अस्नोडा पाणीपुरवठा प्रकल्पाकडे पाण्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे पाण्याची समस्या कोठेही गंभीर झालेली नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी पणजी येथे पत्रकारांना सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, की दरवर्षी नोव्हेंबरमध्ये एक महिन्यासाठी तिळारीच्या पाण्याचा पुरवठा बंद होत असतो. त्या वेळी कालव्यांचे दुरुस्ती काम चालत असते. या वेळी २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीसाठी पाणीपुरवठा थांबविला आहे. तिळारीचे पाणी हे चांदेल व अस्नोडा पाणीपुरवठा प्रकल्पासाठी गरजेचे असते. तिळारीचे पाणी थांबल्यानंतर चांदेल प्रकल्पासाठी बाजूच्याच नदीचे पाणी खेचून घेण्यात आले. मात्र, अस्नोडासाठी तशी व्यवस्था झाली नव्हती. ती आता होत आहे. मुख्यमंत्री म्हणाले, की अस्नोडा प्रकल्पाची गरज ११० एमएलडी आहे; पण तेथील नदीतून फक्त ८० एमएलडी पाणी मिळते. यावर उपाय म्हणून आमठाणे-साळ येथील धरणातील पाणी अस्नोडा येथे आणण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पाण्याविषयी राज्यात कोठे विदारक स्थिती आहे असा विषय नाही. (खास प्रतिनिधी)