शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

गुंतवणूक धोरणाच्या नावाखाली मंत्र्यांच्या हाती सर्व अधिकार

By admin | Updated: July 9, 2015 01:14 IST

पणजी : गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या नावाखाली सरकारने काही मंत्र्यांच्याच हाती राज्यातील कसलेही प्रकल्प मंजूर करण्याचे सर्वाधिकार दिले आहेत.

पणजी : गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या नावाखाली सरकारने काही मंत्र्यांच्याच हाती राज्यातील कसलेही प्रकल्प मंजूर करण्याचे सर्वाधिकार दिले आहेत. राज्याच्या हितासाठी हे अत्यंत घातक आहे, असा आरोप गोवा बचाव अभियानाच्या निमंत्रक सबिना मार्टिन्स, रेबोनी साहा, डिन डिक्रुझ, मिंगेलिन ब्रागांझा, आनंद मडगावकर आदींनी बुधवारी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत केला.सरकार नवा प्रादेशिक आराखडा अस्तित्वात आणत नाही. उलट ओडीपी खुले करते. तसेच गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या नावाखाली मंत्र्यांच्या गटास सर्व अधिकार देते व प्रकल्प मंजूर करते. जमिनींवरील सेटलमेन्ट झोन, व्यावसायिक झोन व अन्य कसलाच विचार न करता प्रकल्प मंजूर केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील गुंतवणूक प्रोत्साहन मंडळावर एकूण चार-पाच मंत्री आहेत. ते सर्वज्ञानी असल्याप्रमाणे प्रकल्पांना मान्यता देतात. मग कोणतेच खाते त्या प्रकल्पांबाबत प्रश्नही उपस्थित करू शकत नाही, असे मार्टिन्स म्हणाल्या. सरकारने त्वरित गुंतवणूक प्रोत्साहन कायद्यातील कलम दुरुस्त करावे आणि प्रकल्प मंजुरीच्या प्रक्रियेत लोकांचा सहभाग घ्यावा, अशी मागणी मार्टिन्स यांनी केली.कोणत्या शहरात वा गावात कोणता प्रकल्प यायला हवा हे ठरविण्याचा अधिकार लोकांना असायला हवा. शिक्षक, वकील, डॉक्टर आदी सर्व समाजघटकांना असायला हवा. मंत्री गटाच्या हाती सर्वाधिकार देणे चुकीचे आहे. अगोदर प्रादेशिक आराखडा सरकारने अस्तित्वात आणावा. आम्हाला राज्यात गुंतवणूक बंद झालेली नको; पण केवळ पाच कोटी खर्चाचे प्रकल्पदेखील मंजुरीसाठी मंत्री गटासमोर म्हणजे प्रोत्साहन मंडळासमोर यावेत, हे आक्षेपार्ह आहे. सध्या सर्वत्र मोठ्या प्रकल्पांकडून नियमभंग केला जातो. याविरुद्ध यापुढे आम्हा सर्व लोकांना एकत्रितरीत्या रस्त्यावर उतरावे लागेल, असे मार्टिन्स म्हणाल्या. (खास प्रतिनिधी)