शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सर्व प्रशासन ठप्प

By admin | Updated: March 13, 2015 00:55 IST

पणजी : राज्यातील पन्नास जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये सर्वच मंत्री व सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी तळ ठोकला आहे.

पणजी : राज्यातील पन्नास जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये सर्वच मंत्री व सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी तळ ठोकला आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्री जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारात खूप व्यस्त आहेत. राज्य प्रशासनावर याचा परिणाम झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. जि.पं. मतदारसंघांना सरकारी छावण्यांचेच रूप प्राप्त झाले आहे. मंत्र्यांना आता पर्वरी येथील मंत्रालयात येण्यासही वेळ नाही. मुख्यमंत्री पार्सेकर व अन्य एक-दोन मंत्री वगळता अन्य कुणी आता जास्त वेळ मंत्रालयात बसत नाहीत. लाल दिव्याच्या गाड्या आता जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्येच फिरत आहेत. प्रशासनावर गेले पंधरा दिवस मंत्रिमंडळाचे लक्ष नाही ही गोष्ट अनेक कामचुकार सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर पडली आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षाचे आमदारही सध्या जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्येच तळ ठोकून आहेत. काही मंत्री व आमदार फक्त रात्री झोपण्यापुरतेच घरी जातात. बाकी सगळा वेळ ते जिल्हा पंचायत मतदारसंघातच फिरत आहेत. विधानसभेचीच निवडणूक असल्याप्रमाणे मंत्री मतदारांच्या घरोघर जाऊन आपल्या उमेदवारांसाठी मते मागत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासन ठप्प झाल्याप्रमाणे स्थिती असून गेल्या महिन्याभरात मंत्रिमंडळ बैठकीत एकही धोरणात्मक किंवा मोठा असा निर्णय झालेला नाही. फक्त काही कंत्राटी पद्धतीवरील नियुक्त्या करणे व अधिकाऱ्यांना सेवावाढ देणे एवढेच निर्णय झाले आहेत; कारण मंत्र्यांना सध्या मोठे विषय घेऊन बसण्यासाठी वेळच नाही. पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, ग्रामीण विकास यंत्रणा मंत्री मिकी पाशेको, उद्योगमंत्री महादेव नाईक, पंचायतमंत्री दयानंद मांद्रेकर, वनमंत्री एलिना साल्ढाणा, सहकारमंत्री दीपक ढवळीकर, क्रीडामंत्री रमेश तवडकर, मजूरमंत्री आवेर्तान फुर्र्तादो यांनी तर स्वत:च्या मतदारसंघांमध्ये प्रचार कार्यासाठी झोकूनच दिले आहे. परुळेकर, महादेव नाईक, एलिना, फुर्र्तादो यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने जिल्हा पंचायत निवडणुकांचे निकाल खूप महत्त्वाचे आहेत. (खास प्रतिनिधी)