शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आक्रमकता कायम

By admin | Updated: September 3, 2014 01:15 IST

पणजी : दिल्ली भेटीवरून नवे बळ घेऊन आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस हे अजून आक्रमक असून, त्यांनी पक्षातील स्वच्छता

पणजी : दिल्ली भेटीवरून नवे बळ घेऊन आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस हे अजून आक्रमक असून, त्यांनी पक्षातील स्वच्छता मोहीम सुरूच ठेवण्याचे ठरविले आहे. तसा निर्धार त्यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलतानाही व्यक्त केला. दिल्ली भेटीवेळी फर्नांडिस यांनी दोनवेळा गोवा प्रभारी दिग्विजय सिंग यांची व एकदा पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांना गोव्यातील काँग्रेसशी निगडित सर्व विषयांची पूर्ण कल्पना आहे. त्यांना बरीच माहिती यापूर्वीचे राज्यपाल भारतवीर वांच्छू यांच्याकडूनही मिळाली असावी, असे फर्नांडिस म्हणाले. गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनाही कल्पना होती; पण त्यांना कुणी तरी थोडी चुकीची माहिती दिली होती. आपण त्यांचे संशय दूर केले, असे फर्नांडिस यांनी नमूद केले. आपण प्रदेशाध्यक्ष या नात्याने काँग्रेसच्या घटनेनुसारच काम करत आहे. आपण एकही चूक केलेली नाही. सर्व गट समित्या विसर्जित करण्याचा अधिकार घटनेने प्रदेशाध्यक्षांना दिला आहे; पण तो अधिकारदेखील आपण एकतर्फी पद्धतीने वापरला नाही. आपण दिग्विजय सिंग व इतरांना कल्पना देऊनच निर्णय घेतला. गोव्यातील काँग्रेसमध्ये आता नव्या रक्तालाच वाव दिला जाईल. नवी व्यवस्था तयार करण्यासाठी जुनी व्यवस्था मोडावी लागते, असे फर्नांडिस म्हणाले. डिसेंबरमध्ये काँग्रेसची सदस्य नोंदणी मोहीम संपुष्टात येईल. त्यानंतर गट समित्यांसाठी निवडणुका होतील. गट समित्या पूर्णपणे पक्षाच्या आमदारांच्या किंवा माजी आमदारांच्या नियंत्रणाखाली ठेवण्याची पद्धत आता निकालात निघेल. आमदारांना गट समित्यांच्या फेररचनेत पंचवीस टक्के स्थान असेल. पंचाहत्तर टक्के स्थान हे पक्षाला असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका या अगोदर फार्स ठरत होत्या, तसे आता होणार नाही. राज्यातील चाळीसही विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी दोन-तीन उमेदवार तयार होतील. सर्व स्तरांवर नवी व्यवस्था काँग्रेसमध्ये अस्तित्वात येईल, असे फर्नांडिस यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)