शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पेडणेत बटालियनसाठी निवास व्यवस्था; आराखडा मंजूर

By admin | Updated: December 28, 2016 01:18 IST

पणजी : पेडणे तालुक्याचा प्रादेशिक आराखडा सरकारच्या राज्यस्तरीय समितीने मंगळवारी येथे झालेल्या बैठकीवेळी मंजूर केला.

पणजी : पेडणे तालुक्याचा प्रादेशिक आराखडा सरकारच्या राज्यस्तरीय समितीने मंगळवारी येथे झालेल्या बैठकीवेळी मंजूर केला. पेडणेत आयआरबी, सीएसआयएफ अशा कंपन्यांच्या बटालियनसाठी निवास व्यवस्था करण्याची तरतूद आराखड्यात करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली समितीची (एसएलव्ही) बैठक पार पडली. यापूर्वी काणकोण व सत्तरी तालुक्याचे आराखडे या समितीने निश्चित करून जाहीर केले आहेत. मंगळवारी पेडणेच्या आराखड्यास अंतिम रूप देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री डिसोझा यांनी बैठकीनंतर ‘लोकमत’ला सांगितले. आराखड्यासाठी एकूण एक हजार सूचना व आक्षेपांचे अर्ज आले होते. त्यापैकी साठ अर्ज स्वीकारण्यात आले व त्यानुसार आराखड्यात बदल करण्यात आल्याचे डिसोझा यांनी सांगितले. मोपा विमानतळाच्या केंद्रबिंदूपासून पाच किलोमीटर अंतरावरील सगळी जागा ही नियोजित मोपा विकास प्राधिकरणाच्या (पीडीए) कक्षेत येणार आहे. पेडणे तालुक्यात चार ते पाच इको-हब तयार केले जातील. तुये येथील नियोजित इलेक्ट्रॉनिक सिटीही आराखड्यावेळी विचारात घेण्यात आली, असे डिसोझा यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)