शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

बाबूशच्या पॅनलमध्ये ६0 टक्के नवे चेहरे

By admin | Updated: December 1, 2015 01:56 IST

पणजी : महापालिका निवडणुकीसाठी या वेळी बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलमध्ये ६0 टक्के नवे चेहरे असतील. अधिकृत

पणजी : महापालिका निवडणुकीसाठी या वेळी बाबूश मोन्सेरात यांच्या पॅनलमध्ये ६0 टक्के नवे चेहरे असतील. अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली, तरी येत्या १३ मार्च रोजी ही निवडणूक घेण्याचे ठरत असल्याने उमेदवार कामाला लागले आहेत. बाबूश पॅनलबरोबरच भाजप तसेच सुरेंद्र फुर्तादो यांचे स्वतंत्र पॅनल मिळून तीन पॅनल्स या वेळी निवडणूक रिंगणात असतील व त्यामुळे काही प्रभागांमध्ये तिरंगी लढतीची शक्यता आहे. मोन्सेरात यांनी या प्रतिनिधीशी बोलताना आपण सर्व ३0 प्रभागांमध्ये उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याचे सांगितले. दोन निवडणुकांमध्ये आपले पॅनल विजयी झाले होते. त्यामुळे उमेदवारांची संख्या कमी करण्याचे किंवा अन्य कोणालाही संधी देण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले. फुर्तादो स्वतंत्र पॅनल स्थापन करणार असल्याने त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला निवडणुकीत उतरण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्याबद्दल भाष्य करणार नाही. निवडणुकीत कोणते मुद्दे घेऊन नागरिकांसमोर जाणार, असे विचारले असता, थेट उत्तर न देता जाहीरनामा तयार करूनच जनतेसमोर जाणार आहोत, असे ते म्हणाले. माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांना विचारले असता, आपले स्वतंत्र पॅनल असेल, असे त्यांनी या प्रतिनिधीला सांगितले. मात्र, अधिक माहिती देण्याचे टाळले. ३० सदस्यीय महापालिकेचा कार्यकाळ येत्या २२ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. प्रभाग पुनर्रचनेचे काम जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. प्रभागांची राखीवता, तसेच मतदार याद्या निश्चित करण्याचे कामही आता सुरू होणार आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत ५० टक्के महिला उमेदवार निवडून आल्या होत्या. काही प्रभागांमध्ये महिला राखीवता नसतानाही त्या प्रभागातून महिलांनी बाजी मारली होती. दरम्यान, विधानसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपल्याने भाजप आमदार सिद्धार्थ कुं कळयेकर यांची महापालिका निवडणुकीत कसोटी लागणार आहे. (प्रतिनिधी)