शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

‘ब्रिक्स’साठी ६० कोटींचे रस्ते

By admin | Updated: September 28, 2016 01:59 IST

पणजी : येत्या दि. १४ आॅक्टोबरपासून दक्षिण गोव्यात होणाऱ्या तीन दिवसीय ब्रिक्स परिषदेच्या तयारीचा तपशीलवार आढावा

पणजी : येत्या दि. १४ आॅक्टोबरपासून दक्षिण गोव्यात होणाऱ्या तीन दिवसीय ब्रिक्स परिषदेच्या तयारीचा तपशीलवार आढावा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंगळवारी घेतला. एकूण ६० कोटी रुपये खर्चून रस्ता दुरुस्ती व रुंदीकरण केले जाणार आहे. तसेच १७३ वाहनांचा वापर केला जाणार आहे. एकूण ६१ टॉवर्स दक्षिण गोव्यात उभे केले जातील. ब्रिक्स परिषदेच्या तयारीसाठी सरकारने खास सचिवालयाची स्थापना केली आहे. या सचिवालयाची पहिली बैठक मंगळवारी पार पडली. मुख्यमंत्री पार्सेकर हे या सचिवालयाचे अध्यक्ष, तर उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे उपाध्यक्ष आहेत. डिसोझा यांच्यासह मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी व साधनसुविधा विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीत भाग घेतला. उपमुख्यमंत्री डिसोझा यांनी बैठकीनंतर ‘लोकमत’ला सांगितले की, ब्रिक्स परिषदेवेळी वेर्णा ते दाबोळी विमानतळापर्यंतच्या मार्गावर सौंदर्यीकरण केले जाईल. खूप मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्थेचा वापर केला जाणार आहे; कारण हजारभर महनीय व्यक्ती या परिषदेस येणार आहेत. अनेक राष्ट्रांचे प्रमुख सहभागी होतील. त्यांच्या सुरक्षेसाठी जास्त मनुष्यबळ वापरावे लागेल. (खास प्रतिनिधी)