शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयांमध्ये ४० अधिकाऱ्यांकडून ‘छापे’

By admin | Updated: December 11, 2015 00:22 IST

राज्यातील बाराही तालुक्यांतील गटविकास अधिकारी (बीडीओ), मामलेदार, जिल्हाधिकारी, नगर नियोजन अशा अनेक

राज्यातील बाराही तालुक्यांतील गटविकास अधिकारी (बीडीओ), मामलेदार, जिल्हाधिकारी, नगर नियोजन अशा अनेक कार्यालयांमध्ये गुरुवारी सुमारे ४0 अधिकाऱ्यांनी ‘छापे’ टाकले व कार्यालयांचा पंचनामाच केला. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता पर्वरी येथील मंत्रालयात या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन पंचनाम्याचा आढावा घेणार आहेत. सरकारने यापूर्वी अनेक सेवा कालबद्ध केल्या आहेत. सरकारी अधिकाऱ्यांनी मोठा गाजावाजा करत त्याबाबतचे अहवालही यापूर्वी तयार केले व लोकांची कामे आता अत्यंत जलदगतीने होतील, असे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात सरकारी कार्यालयांमध्ये लोकांना कसा अनुभव येतो व साध्या साध्या कामांच्या अर्जांवरही दीर्घकाळ कसे निर्णय होत नाहीत, याची कल्पना सरकारला आली आहे. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बाराही तालुक्यांतील सर्व महत्त्वाच्या कार्यालयांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकांनी अचानक भेट द्यावी, अशी योजना बुधवारी आखली. ज्येष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांनी आपल्यासोबत प्रत्येकी तीन किंवा चार कनिष्ठ श्रेणीतील अधिकारी घ्यावेत व या पथकांनी गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता बाराही तालुक्यांतील सरकारी कार्यालयांमध्ये अचानक जावे आणि कोणता कर्मचारी कोणत्या वेळी कामावर आला, त्याने काय काम केले, किती अर्ज प्रलंबित आहेत किंवा कोणती समस्या सुटलेली नाही, कोणते संगणक व अन्य उपकरणे चालतात वगैरेचा आढावा घ्यावा, अशी सूचना केली. दिवसभर या पथकांनी कार्यालयात थांबावे, मस्टर रोलच्याही झेरॉक्स प्रती आणाव्यात, असे अधिकाऱ्यांच्या पथकांना सांगण्यात आले. गुरुवारी सकाळपासून मुख्यमंत्र्यांच्या या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. बीडीओ, मामलेदार, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी अशा अनेक कार्यालयांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक जाऊन बसले आणि कार्यालयातील कामकाजाच्या नोंदी तसेच अन्य माहिती गोळा केली.