शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

‘ल्युसोफोनिया’त १00 कोटींचा घोटाळा!

By admin | Updated: July 20, 2014 01:40 IST

पणजी : जानेवारी महिन्यात झालेल्या ल्युसोफोनिया स्पर्धेमध्ये ५0 ते १00 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी

पणजी : जानेवारी महिन्यात झालेल्या ल्युसोफोनिया स्पर्धेमध्ये ५0 ते १00 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. येत्या दोन ते तीन दिवसांत सीबीआयकडे तक्रार करून ल्युसोफोनिया क्रीडा स्पर्धांमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे कामत यांनी सांगितले. ल्युसोफोनिया स्पर्धेदरम्यान भाडेतत्त्वावर मागविण्यात आलेल्या चारचाकी गाड्यांवर एकूण ३ कोटी ८७ लाख रुपये खर्च करण्यात आले. क्रीडा स्पर्धा १८ ते २९ जानेवारी दरम्यान झाल्या होत्या. मात्र, १३ तारखेपासून चारचाकी गाड्या भाडेपट्टीवर घेण्यात आल्या. यात फॉर्च्युनर, आॅडी, कॅमरी, इनोव्हा इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. प्रतिनिधींसाठी व क्रीडापटूंची ने-आण करण्यासाठी लावण्यात आलेल्या एकूण १९0 गाड्या महाराष्ट्राच्या आहेत. गोव्यात इनोव्हा गाडी एका दिवसाच्या भाडेपट्टीवर पाच ते सहा हजार रुपयांत उपलब्ध होते, तर महाराष्ट्राहून अशाच इनोव्हा ११ हजार रुपये प्रति दिवसासाठी का आणण्यात आल्या, असा प्रश्न कामत यांनी केला. ल्युसोफोनिया स्पर्धेच्या उद्घाटन व समारोप सोहळ्यावर एकूण किती खर्च आला, असा प्रश्न आरटीआयद्वारे विचारला असता उत्तर मिळू शकले नाही. मात्र, यापूर्वी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नात यासाठी २२ कोटी ४२ लाख २0 हजार रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे उत्तर मिळाले आहे. (पान २ वर)