शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पर्यावरण संवर्धनासाठी विश्वभ्रमंती करणारे तिन ध्येयवेडे सिंधुदुर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 14:35 IST

सिंधुदुर्गनगरी दि. २७ : तब्बल ३७ वषार्पूर्वी पर्यावरण संवर्धनाचे व्रत घेऊन घराबाहेर पडलेले तीन ध्येयवेडे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. भारतासह ११ देशांत साडेतीन लाख किलोमीटरची पायपीट करीत या ध्येयवेड्यांनी साडेनऊ कोटी वृक्षांची लागवड केली आहे. अवध बिहारी लाल, जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप अशी या ध्येवेड्यांची नावे आहेत.सिंधुदुर्गामध्ये शुक्रवार दि. २८ ...

ठळक मुद्देसाडेनऊ कोटी वृक्षांची लागवड भारतासह ११ देशांत साडेतीन लाख किलोमीटरची पायपीटशाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

सिंधुदुर्गनगरी दि. २७ : तब्बल ३७ वषार्पूर्वी पर्यावरण संवर्धनाचे व्रत घेऊन घराबाहेर पडलेले तीन ध्येयवेडे सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. भारतासह ११ देशांत साडेतीन लाख किलोमीटरची पायपीट करीत या ध्येयवेड्यांनी साडेनऊ कोटी वृक्षांची लागवड केली आहे. अवध बिहारी लाल, जितेंद्र प्रताप, महेंद्र प्रताप अशी या ध्येवेड्यांची नावे आहेत.सिंधुदुर्गामध्ये शुक्रवार दि. २८ जुलै २0१७ रोजी जिल्हा परिषद आवारात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील काही शाळांना भेटी देवून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पर्यावरणाचे महत्व आणि त्याबाबतची माहिती विशद करण्यासाठी उपप्रादेशिक परीवहन, वनअधिकारी आणि काही नगर परीषदांना भेटी देणार आहे.

या मोहिमेची सुरुवात अवध बिहारी लाल यांनी १९८0 मध्ये केली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पर्यावरण संरक्षणाची देशाला हाक दिली. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत अवध बिहारी लाल पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सरसावले.

तेव्हापासून त्यांनी वृक्ष लागवडीची मोहीमच हाती घेतली. पहिली पंधरा वर्षे ते एकटेच देशभर पायपीट करीत होते. १९९५ पासून त्यांच्या या मोहिमेत तरुण, तरुणी सहभागी होऊ लागले. काहींनी मध्यावरच मोहिम सोडली, तर काहीजण या मोहिमेचे अविभाज्य अंगच बनून गेले. सध्या २0 जणांचा चमू लाल यांच्यासोबतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत भ्रमंती करीत आहे. त्यात चार मुलींचाही समावेश आहे.आतापर्यंत त्यांनी अकरा देशात साडेतीन लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे. तसेच साडेनऊ कोटी वृक्षांची लागवडही केली आहे. लिम्का, गिनिज व इंडिया स्टार बुक आॅफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद झाली आहे. असे अवध बिहारीलाल यांनी अशी माहिती दिली आहे.ही पर्यावरण भ्रमंती करणाºया चमूने गुरुवारी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरसिंह आदि वरीष्ठ अधिकाºयांची भेट घेतली व आपल्या या पर्यावरण विषयक भ्रमंतीबाबतची माहिती त्यांना दिली.

देशात आणि राज्यात पर्यावरण आणि वृक्षारोपण या महत्वांच्या बाबींकडे लक्ष देणा-या आणि जनासामान्यात जनजागृती करणा-या या पदभ्रमंती ध्येयवेड्यांची जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वागत केले.