शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

नियमबाह्य मासेमारी करणाºयांवर कठोर कारवाई करणार : महादेव जानकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 14:42 IST

मुंबई, दि. २७ : राज्यातील सागरी किनारपट्टीवर अनधिकृत आणि १२ सागरी मैल (नॉटिकल)च्या बाहेर जाणाºया बोटींवर व नियमबाह्य मासेमारी करणाºयांवर सागरी मासेमारी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी विधानपरिषदेत दिली.

ठळक मुद्देयांत्रिकी नौकांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हिटीएस) प्रणाली बंधनकारकसागरी मासेमारी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई ३ हजार ५३१ नौकांवर कारवाई केली २७ लाख १९ हजार ५५८ एवढा महसूल प्राप्त दंड आकारणीतून १२ लाख ३२ हजार रुपये इतकी रक्कम मिळाली

मुंबई, दि. २७ : राज्यातील सागरी किनारपट्टीवर अनधिकृत आणि १२ सागरी मैल (नॉटिकल)च्या बाहेर जाणाºया बोटींवर व नियमबाह्य मासेमारी करणाºयांवर सागरी मासेमारी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी विधानपरिषदेत दिली.विधानपरिषदेत अधार्तास चर्चेच्या माध्यमातून सदस्य अ‍ॅड. राहूल नार्वेकर यांनी उपस्थित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले समुद्रात मिनी पर्ससीन नेटधारकांकडून अनधिकृत मासेमारी संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना जानकर बोलत होते.राज्यातील किनारपट्टीवरील भागात अनधिकृतपणे केल्या जाणाºया मासेमारी संदर्भात कठोर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमध्ये आतापर्यंत ३ हजार ५३१ नौकांवर कारवाई केली असून त्यामधे २७ लाख १९ हजार ५५८ एवढा महसूल प्राप्त झाला असून, दंड आकारणीतून १२ लाख ३२ हजार रुपये इतकी रक्कम मिळाली आहे. यांत्रिकी नौकांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हिटीएस) ही प्रणाली बंधनकारक करण्यात येणार असून, या प्रणालीचे नियंत्रण जिल्ह्यातील मत्स्य विभागाचे सहायक आयुक्त यांच्याकडे असणार आहे.मत्स्यव्यवसाय विभागाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ भरण्यात येणार असून यासंबंधातील प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असून या कामात दिरंगाई करणाºया अधिकाºयांवर कारवाई करण्यात येईल, असेही पदुम मंत्री जानकर यांनी सांगितले.मत्स्यव्यवसाय वाढीसाठी १ कोटीची नवीन योजना तयार करण्यात येणार आहे. राज्यात मत्स्यव्यवसाय धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखली बैठक घेवून निर्णय घेण्यात येईल, असेही जानकर यांनी सांगितले. या चर्चेदरम्यान सदस्य सर्वश्री जयंत पाटील, श्रीमती डॉ. नीलम गोºहे, हुस्नबानो खलिफे आदींनी सहभाग घेतला.