शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीकडून जि.प.तील गैरव्यवहाराची दखल

By admin | Updated: October 11, 2015 02:38 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार राज्य शासनाकडे प्राप्त झाली.

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार राज्य शासनाकडे प्राप्त झाली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी याची दखल घेत गोपनीय चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती शुक्रवारी गडचिरोलीत आयोजित पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते मनोहर चलाख यांनी दिली.या संदर्भात माहिती देताना चलाख म्हणाले, गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार झाला आहे. कोणतीही ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ही कंत्राटदार बनू शकत नाही. असे असताना देखील जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ग्रामपंचायतींना कंत्राटदार बनवून १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर इमारत व रस्त्याचे कंत्राट दिले. याच पेपरवर करारनामेही करण्यात आले. जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यातील २८, धानोरा २४, आरमोरी १०, गडचिरोली ४१, चामोर्शी ३०, कुरखेडा २१, अहेरी २६, एटापल्ली १४, मुलचेरा १२, देसाईगंज १२, भामरागड ९ व कोरची १३ या संख्येनुसार ग्रामपंचायतींना काम देण्यात आले. यातून एकमेकांच्या संगणमताने कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार करण्यात आला. या प्रकरणाची लेखी तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव, ग्राम विकास खाते व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली होती. त्यानुसार चौकशी सुरू झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.