शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेची लेटलतिफशाही

By admin | Updated: September 6, 2014 01:53 IST

साऱ्याच बाबतीत मागे असलेल्या गडचिरोली जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने जिल्ह्यातील आदर्श शिक्षक निवडीचेही काम विलंबाने पार पाडल्याने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन ...

गडचिरोली : साऱ्याच बाबतीत मागे असलेल्या गडचिरोली जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने जिल्ह्यातील आदर्श शिक्षक निवडीचेही काम विलंबाने पार पाडल्याने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी गडचिरोली जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा सन्मान होऊ शकला नाही. याबाबीला केवळ जिल्हा परिषदेची लेटलतिफशाहीच कारणीभूत ठरल्याची प्रतिक्रिया अनेक शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. सन २०१४-१५ या वर्षांमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक निवडून त्यांचा सन्मान करण्याचे काम गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला करायचे होते. परंतु गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक निवड समितीची बैठक शिक्षक दिनाच्या आदल्या दिवशी पार पडली. या बैठकीत ८ आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र शिक्षकांची निवड करण्यात आली. १२ शिक्षकांची निवड करावयाची असताना केवळ ८ जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील वसा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विलास नक्टूजी भांडेकर, आरमोरी येथील जि.प. शाळेचे शिक्षक गोपीनाथ तुकाराम नेवारे, देसाईगंज तालुक्यातील आमगाव जि.प. शाळेचे शिक्षीका सुनंदा बाबुराव पारटवार, कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा शाळेचे शिक्षक पुरंदर रामचंद्र चौधरी, चामोर्शी तालुक्यातील पेठतळा जि.प. शाळेचे शिक्षक वासुदेव आत्माराम कुनघाडकर, मुलचेरा तालुक्यातील कांचनपूर जि.प. शाळेचे शिक्षक अनिल शंकर मार्तीवार, अहेरी तालुक्यातील वेलगुर जि.प. शाळेचे शिक्षक रमेश पांडूरंग कुसनाके, भामरागड तालुक्यातील धोडराज जि.प. शाळेचे शिक्षक लालदेव फकीराजी कोडापे यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राज्यभर आदर्श शिक्षकांचा ५ सप्टेंबर सत्कार होत असताना गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ५ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता आदर्श शिक्षकांच्या नावाची यादी माध्यमांकडे प्रसिध्दीसाठी पाठविली. सुत्रांच्या माहितीनुसार शिक्षक निवड समितीची बैठकच गुरूवारी पार पडली. त्यामुळे सत्कार सोहळा शुक्रवारी घेणे शक्यच नव्हते. त्यामुळे आता या सत्कार सोहळ्याची तारीख नंतर ठरविली जाईल, असे शिक्षण विभागाने सांगितले.