शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

जिल्हा परिषद सदस्यांचे मतदार संघाकडे दुर्लक्ष

By admin | Updated: December 18, 2014 01:07 IST

तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर काही कालावधीकरिता लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत होते़ ..

देसाईगंज : तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर काही कालावधीकरिता लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत होते़ मात्र हल्ली केवळ नाटकांच्या उद्घाटनाच या लोकप्रतिनिधींचा चेहरा दिसत आहे़ सर्वसामान्य ग्रामीण जनतेचे प्रश्न जिल्हा परिषदेत मांडून समस्या सोडविण्यापेक्षा प्रश्नांकडेच डोळेझाक करून स्वस्थ बसण्याला जिल्हा परिषद सदस्यांनी पसंती दिली आहे़ त्यामुळेच जिल्हा परिषद सदस्या बाबतीत सर्वसामान्य जनतेत असंतोष दिसत आहे़देसाईगंज तालुक्यात कोरेगाव-डोंगरगाव, सावंगी-विसोरा व कुरूड-कोकडी हे तीन जिल्हा परिषद क्षेत्र आहेत़ या तिनही जिल्हा परिषद जागा महिलांकरिता राखीव आहेत़ सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जिल्हा परिषदेत मांडून त्या समस्या सोडविण्या साठी ग्रामीण जनतेने त्यांना निवडून आणले आहे़ जिल्हा परिषद निवडणूकीत सावंगी-विसोरा ही जागा भाजपा, कुरूड - कोकडी येथून कॉग्रेस तर कोरेगांव - डोंगरगाव ही जागा युवाशक्तीने विजय मिळविला होता. निवडणुकीत अनेक आश्वासने मतदारांना देण्यात आले. निवडून आल्यावरही सदस्यांनी अनेक आश्वासने दिली होती़ मात्र या सदस्यांनी एकाही आश्वासनाची पूर्तता केली नाही़ जिल्हा परिषद सदस्य केवळ नाटकाचे उद्घाटन, शाळांच्या कार्यक्रमापुरतेच उरलेले आहेत, असे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील एकाही गावात जिल्हा परिषदे अंतर्गत कोणतेही काम झालेले नाही़ जिल्हा परिषद निवडणुकांना आता तीन वर्ष होत आले. एवढा कालावधी लोटूनही काही सदस्यांना अजूनही ग्रामीण भागातील नागरिक नीट ओळखत देखील नाही. जनसंपर्काच्या अभावामुळे ग्रामीण जनता लोकप्रतिनिधीपासून दुरावल्याचे चित्र दिसून येत आहे.काही पंचायत समितीचे सदस्य मात्र पदावर असताना लोकांशी सतत संपर्क ठेवून आहेत. गावागावात जाऊन लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी धडपडत आहे. हे चित्र मात्र तीन महिला जि. प. सदस्यांबाबत तालुक्यात दिसून येत नाही. (वार्ताहर)