शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे ‘बजेट’ निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 00:59 IST

जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ समजल्या जिल्हा परिषदेत मंगळवारी नवीन आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मांडण्यात आला. मात्र गेल्यावर्षीपेक्षा हा अर्थसंकल्प चक्क निम्म्यावर आला आहे.

ठळक मुद्देअवघी ६.१७ कोटींची तरतूद : निधीच नसल्यामुळे कामांवर होणार परिणाम, विरोधकांचे टीकास्त्र

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ समजल्या जिल्हा परिषदेत मंगळवारी नवीन आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मांडण्यात आला. मात्र गेल्यावर्षीपेक्षा हा अर्थसंकल्प चक्क निम्म्यावर आला आहे. यावर्षी विविध कामांसाठी अवघी ६ कोटी १७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्यामुळे विविध कामांवर चांगलाच परिणाम होणार आहे. अवघ्या अर्ध्या तासात आटोपलेल्या या अर्थसंकल्पिय बैठकीनंतर विरोधी सदस्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली.जिल्हा परिषदेच्या गेल्यावर्षीच्या (२०१७-१८) अर्थसंकल्पात विविध विभागांच्या कामांसाठी १२ कोटी ८९ लाख ३१ हजार रुपये खर्चाची होती. अंतिम सुधारित अर्थसंकल्पात ही तरतूद कमी करून १२ कोटी ७५ लाख ३३ हजारांवर आणली होती. त्यामुळे ३५ लाख २ हजार रुपये शिल्लक होते. यावर्षी (२०१८-१९) साठी मात्र एकूण ६ कोटी १७ लाखांच्या तरतुदीपैकी ९ लाख १२ हजार रुपये शिल्लक ठेवून अवघ्या ६ कोटी ८ लाख रुपयांच्या कामांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक २ कोटी ६४ लाख ४६ हजार रुपयांची तरतूद बांधकाम विभागासाठी आहे. मात्र उर्वरित सर्व विभागांचा बजेट लाखांमध्येच खेळणार आहे. त्यात प्रशासकीय यंत्रणेसाठी ९० लाख, सामान्य प्रशासन विभागासाठी ५४ लाख ७० हजार, वित्त विभागासाठी ४.३० लाख, शिक्षण विभागासाठी ५२.६६ लाख, पाटबंधारे विभागासाठी ३१.५० लाख, आरोग्य विभागासाठी १३.६५ लाख, कृषी विभागासाठी ९.५० लाख, पशुसंवर्धन विभागासाठी ७.९१ लाख, सामूहिक विकासासाठी ५ लाख, निवृत्ती वेतनासाठी १७ लाख, समाजकल्याण विभागासाठी २.५० लाख, महिला व बालकल्याण विभागासाठी २.६६ लाख, संकिर्ण (पंचायत/सामान्य प्रशासन) २०.७७ लाख, २० टक्के सेससाठी तरतूद १०.२४ लाख, ग्रामपंचायत पाणी पुरवठा देखभाल दुरूस्तीसाठी १०.२४ लाख, महिला व बालकल्याण विभागाला ५.१२ लाख, अपंग कल्याणाकरिता १.५४ लाख, ई-गव्हर्नन्सकरिता ४.२५ लाख अशी तरतूद केली आहे.पगार आणि भत्त्यांवरच जास्त खर्चप्रशासनावरील खर्चाच्या तरतुदीत सर्वाधिक ३० लाखांचा खर्च उपाध्यक्ष, विषय समिती सभापती, पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापतींच्या मानधनावर होणार आहे. याशिवाय जि.प.सदस्यांना ‘एसटी बस’ने फिरण्यासाठी प्रवास भत्ता म्हणून दरमहा ३ हजार आणि १२०० रुपये दिले जातात. त्यासाठी २०.४० लाखांची तरतूद आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या सभांच्या सादील खर्चासाठी १५ लाखांची तरतूद केली आहे. सामान्य प्रशासन विभागातून सर्वाधिक १९ लाख २० हजार रुपयांची तरतूद वाहनांमधील पेट्रोल-डिझेलसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा निधी प्रत्यक्षात विकासात्मक कामांवर कमी आणि पदाधिकारी व सदस्यांवरच जास्त खर्च होत असल्याचे दिसून येते.शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पानेया अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठीच्या योजनांसाठी अत्यंत तोकडी तरतूद केली. शेतांना तारांच्या कुंपनासाठी पैसे नाहीत. समाजभवन, गोटुलसाठी अवघी १० लाखांची तरतूद केली आहे. दुधाळू जनावरे वाटपाची योजना बंद केली. विधवा, परित्यक्त्यांच्या मदतीसाठी पैसे ठेवले नाही. आकस्मिक खर्चासाठी सेस फंडात पैसे नाहीत. त्यामुळे या बजेटने शेतकऱ्यांसह सर्वांनाच निराश केले असल्याची निराशाजनक भावना जि.प.चे ज्येष्ठ सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम व अतुल गण्यारपवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. दरम्यान जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी फेरबजेटमध्ये योग्य ती दुरूस्ती करण्याचे आश्वासन दिले.