शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण इमारतीचे निर्लेखन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोरची : कोचीनारा येथील जि. प. शाळेतील एक इमारत जीर्णावस्थेत आहे. ती केव्हाही कोसळून अपघात होण्याची ...

ठळक मुद्देकोचीनारा येथे आंदोलन : नागरिकांनी दोन तास बंद पाडली वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोचीनारा येथील जि. प. शाळेतील एक इमारत जीर्णावस्थेत आहे. ती केव्हाही कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. सदर इमारतीचे निर्लेखन करून नव्याने बांधकाम करावे, या मागणीसाठी गावातील नागरिकांच्या वतीने शुक्रवारी ठिया आंदोलन करण्यात आले. परंतु अधिकाऱ्यांनी भेट देऊन आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.कोरचीनारा येथील इमारतीचे निर्लेखन करण्याबाबत सन २०१५-१६ मध्ये गटशिक्षणाधिकाºयांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. दरम्यान शाळेला कुलूप ठोकून तीन दिवस शाळा बंद ठेवण्यात आली होती. याही वेळी अधिकाºयांनी केवळ आश्वासनच दिले. परंतु ते पूर्ण केले नाही. शाळेतील विद्यार्थी या परिसरात नेहमी खेळत असतात. त्यांना धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर इमारत निर्लेखित करून पाडण्यात यावी, अशी मागणी भ्रष्टाचार निवारण समितीचे पदाधिकारी व कोचीनारा येथील नागरिकांनी केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये संवर्ग विकास अधिकाºयांना निवेदन दिले होते. २६ डिसेंबर २०१८ ला निवेदन देऊन २४ जानेवारी २०१९ पर्यंत इमारतीचे निर्लेखन करावे, अन्यथा २५ जानेवारीला आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीतर्फे देण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी बीएसएनएल कार्यालयाजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अधिकाºयांनी इमारतीचे निर्लेेखन केले जाईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी बीडीओ एस. आर. टिचकुले, बीईओ आबाजी आत्राम, पोलीस प्रभारी अधिकारी गोरखनाथ दहिफडे, पीएसआय महेश कोंडुभैैरी, आनंद श्रीमंगल उपस्थित होते.या आंदोलनात समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद देवीकार, आयेशा अली, जितेंद्र सहारे, आशिष अग्रवाल, राहुल अंबादे, श्याम यादव, सिद्धू राऊत, वसीम शेख, अनिल नंदेश्वर, चेतन कराडे, बंटी जनबंधू, अभिजित निंबेकर तथा सदस्य धम्मदीप लाडे, चंदू वालदे, राकेश वर्मा, भुमेश शेंडे, रवी जनबंधू, सोरदे, कैलाश राजपुरोहित व नागरिक हजर होते.

टॅग्स :Strikeसंप