शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठात शुक्रवारी कार्यशाळा

By admin | Updated: October 20, 2016 02:31 IST

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गोंडवाना विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाला डिजिटल इंडियावर...

कुलगुरूंची माहिती : २०० रासेयो स्वयंसेवकांसह ७० अधिकारी होणार सहभागीगडचिरोली : भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गोंडवाना विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाला डिजिटल इंडियावर कार्यशाळा आयोजित करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार सदर कार्यशाळा २१ आॅक्टोबर रोजी शुक्रवारला होणार आहे. यामध्ये विद्यापीठांतर्गत महाविद्यालयांतील रासेयोचे २०० स्वयंसेवक, २० कार्यक्रम अधिकारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे ३० अधिकारी व शासनाच्या डिजिटल इंडिया विभागाचे २० अधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. जी. व्ही. दळवे, डॉ. नरेश मडावी, डॉ. प्रिया गेडाम उपस्थित होत्या. डिजिटल इंडियावर कार्यशाळा आयोजित करण्यासाठी भारत सरकारच्या सदर मंत्रालयाने देशभरातील १२० विद्यापीठांची निवड केली. यामध्ये महाराष्ट्रातील ५ विद्यापीठांचा समावेश आहे. मुंबई, लातूर तसेच अन्य दोन ठिकाणच्या विद्यापीठांसह गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाला सदर कार्यशाळा आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. या कार्यशाळेत तज्ज्ञ व्यक्ती आभासी सादरीकरण करणार असून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत रासेयो स्वयंसेवकांसाठी प्रहसन, पोस्टर, प्रश्नमंजुषा व वक्तृत्त्व स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशी माहितीही कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी दिली. मोठ्या विकसीत शहरातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी तंत्रज्ञानात मागे राहू नयेत, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. कल्याणकर यांच्या हस्ते होणार असून राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डॉ. के. व्ही. खादरीनरसिंमया हजर राहणार आहेत.