शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

परिचरच सांभाळतो पशुवैद्यकीय दवाखाना

By admin | Updated: December 22, 2014 22:46 IST

स्थानिक पंचायत समितींतर्गत असलेल्या नागेपल्ली येथे जि.प. च्या पशुसंवर्धन विभागामार्फत श्रेणी क्रमांक १ चा पशुवैद्यकीय दवाखाना सुरू आहे. मात्र या पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेल्या

अहेरी : स्थानिक पंचायत समितींतर्गत असलेल्या नागेपल्ली येथे जि.प. च्या पशुसंवर्धन विभागामार्फत श्रेणी क्रमांक १ चा पशुवैद्यकीय दवाखाना सुरू आहे. मात्र या पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेल्या पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक चव्हाण हे २७ नोव्हेंबरपासून दवाखान्यात गैरहजर राहत आहेत. त्यामुळे या दवाखान्याचा कारभार कार्यरत असलेल्या परिचरालाच सांभाळावा लागत आहे. त्यामुळे नागेपल्ली परिसरात पशुवैद्यकीय सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. अहेरी तालुक्यातील नागेपल्ली पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत १५ हून अधिक गावांचा समावेश आहे. या १५ ही गावातील पशुवैद्यकीय सेवेचा भार नागेपल्लीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यावर आहे. दुर्गम भाग असल्यामुळे या परिसरात खासगी पशुवैद्यकीय सेवेची व्यवस्थाही नाही. त्यामुळे या भागातील पशुपालकांना नागेपल्लीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यावरच अवलंबून राहावे लागते. पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत परिचर पदावर कार्यरत एस. एस. गोमासे यांना जनावरांवर उपचार करावा लागत आहे. या दवाखान्यात तीन पदे कार्यरत असून पशुवैद्यकीय पर्यवेक्षक नैताम यांना राजाराम येथील पशुवैद्यकीय दवखान्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून नागेपल्लीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांना लसीकरण करण्यात आले नाही. नागेपल्लीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत आलापल्ली, पुसूकपल्ली, टेकेमपल्ली, रामय्यापेठा, तुर्कमपल्ली, येनकापल्ली, मोदुमाडगू आदी गावांचा समावेश आहे. नागेपल्लीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा नामफलकही गेल्या अनेक दिवसांपासून गायब झाला आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे येथील सेवा पूर्णत: कोलमडली आहे. (शहर प्रतिनिधी)