शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

मार्र्कं डाच्या जीर्णोद्धाराचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:39 IST

चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा देवस्थानाच्या जीर्णोद्धाराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने दोन वर्षांचा कालावधी उलटूनही जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले नाही. मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देदोन वर्षे उलटली : कंत्राटदारावर कारवाईची मागणी; मंदिराचे सौंदर्य हरपले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडा देवस्थानाच्या जीर्णोद्धाराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने दोन वर्षांचा कालावधी उलटूनही जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले नाही. मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.मार्र्कंडेश्वर मंदिर गतवैभवाची साक्ष देत हजारो वर्षांपासून उभे आहे. जागतिक कीर्तीचे वास्तूशिल्प, मंदिरे, दुर्ग, गड, किल्ले यांची देखरेख ठेवण्याची जबाबदारी भारतीय पुरातत्त्व विभागाकडे आहे. मार्र्कंडादेव मंदिराच्या गर्भगृहातील भिम तुटत असल्याचे लक्षात आल्यानंतर पुरातत्त्व विभागाच्या उच्चस्तरीय समितीने २१ फेब्रुवारी २०१५ ला मंदिराची पाहणी केली. पाहणीदरम्यान गर्भगृहासह मंदिराचा व तिर्थक्षेत्राच्या विकासाचा आराखडा शासनाला सादर केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जीर्णोद्धाराच्या कामाचे थाटात भूमिपूजन झाले. जीर्णोद्धारासाठी ४ कोटी ९० लाख रूपयांचा निधी मंजूर केला. सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन पुरातत्त्व विभागाच्या अधिकाºयांनी दिले.जानेवारी २०१६ पासून प्रत्यक्ष मंदिराच्या कामाला सुरुवात झाली. गर्भगृहात असलेले भगवान शंकराच्या तांब्या, चांदीच्या पिंडी व पूजेचे साहित्य गर्भगृहातून बाहेर काढून मंदिराजवळच्या भिंतीच्या कोपºयात ठेवण्यात आले आहेत. चार वर्षांपासून बाहेरच पूजा केली जात आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे. कळस खोलून असल्याने मंदिराचे सौंदर्यच नाहिसे झाले आहे.महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी आठ दिवसांची जत्रा भरते. जत्रेदरम्यान लाखो भाविक मार्र्कंडा देवस्थानाला भेट देतात. मात्र जीर्णोद्धारासाठी मंदिरावरील दगड काढून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मंदिराचे वैभव भाविकांना बघायला मिळत नाही. केवळ सहा महिन्यात मंदिराचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. आता मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटत चालला असला तरी काम पूर्ण झाले नाही. संबंधित कंत्राटदारावर कायदेशिर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.कंत्राटदाराला मजूर मिळेनामार्कंडादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चंद्रपूर येथील एका कंत्राटदारामार्फत केले जात आहे. आवश्यक तेवढे कुशल कामगार व मजूर कामावर लावल्या जात नाही. कुशल मजुरांना कमी प्रमाणात मजुरी दिल्या जाते. काही मजुरांच्या मजुरीही दिल्या नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे स्थानिक मजूर कामावर जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे काम आणखी लांबण्याची शक्यता आहे. नागपूर येथील अधिकाºयांनी कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी आहे.दोन वर्षांचा कालावधी उलटत चालला असतानाही कंत्राटदाराने मार्कंडेश्वर देवस्थानाचे काम करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने जून २०१८ मध्ये धार्मिक स्थळांसंबंधी निर्देश जारी केले आहे. यामध्ये धार्मिक स्थळातील गैरव्यवस्थेबाबत जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल करण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार तक्रार केली जाणार आहे. ४ मार्चपासून मार्कंडादेव येथे जत्रा भरणार आहे. त्यापूर्वी मंदिराच्या गर्भगृहाचे व इतर आवश्यक कामे करून भाविकांना पूजेसाठी सोय उपलब्ध करून द्यावी.- काशिनाथ भडके, सेवानिवृत्त बीडीओ तथा जिल्हाध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार सेल काँग्रेस, गडचिरोली