शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

जांभुळखेडा तलाव पाटाचे काम होणार

By admin | Updated: August 31, 2015 01:13 IST

मागील ४० वर्षांपासून वन कायद्याच्या कचाट्यात रखडलेले जांभुळखेडा येथील लघु सिंचन तलावाच्या पाटाचे बांधकाम गावकऱ्यांनी श्रमदानातून करण्याचे ठरविले आहे.

श्रमदानासाठी गावकऱ्यांचा पुढाकार : ४० वर्षांपासून रखडले होते बांधकाम कुरखेडा : मागील ४० वर्षांपासून वन कायद्याच्या कचाट्यात रखडलेले जांभुळखेडा येथील लघु सिंचन तलावाच्या पाटाचे बांधकाम गावकऱ्यांनी श्रमदानातून करण्याचे ठरविले आहे. रविवारी गावकऱ्यांनी कुदळ, फावडे घेऊन कामाच्या स्थळी दाखल झाले. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. रखडलेल्या तलाव पाट बांधकामाचा प्रश्न निकाली काढण्याकरिता चार ते पाच दिवसांपूर्वी गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, जि. प. सदस्य अशोक इंदूरकर, मनोहर लांजेवार, दिगांबर मानकर यांना गावकऱ्यांनी पाचारण केले होते. अनेक वर्षांपासून रखडलेले तलावाचे पाट बांधकाम श्रमदानातून पूर्ण करण्याचा गावकऱ्यांनी संकल्प केला. त्यानंतर ३० आॅगस्ट रोजी गावकरी कुदळ, फावडे घेऊन नगर पंचायत प्रांगणात हजर झाले. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची कुणकुण लागताच वनपरिक्षेत्राधिकारी सोनवाने उपस्थित झाले. त्यांनी गावकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. सुरेंद्रसिंह चंदेल यांनीही उपवनसंरक्षकांशीही भ्रमणध्वनीवर सकारात्मक चर्चा केली. वन विभागातर्फे प्रत्यक्षात कामाला मंजुरी प्रदान करण्याचे आश्वासन दिले. सदर तलावाच्या सिंचनाचे लाभ जांभुळखेडा, येरंडी, गोठणगाव, मालदुगी येथील शेतकऱ्यांना होणार आहे. उपवनसंरक्षकांशी सकारात्मक चर्चेनंतर जांभुळखेडा येथे ३१ आॅगस्ट रोजी प्रत्यक्ष सर्वेकरिता सर्वेअर व सिंचाई विभागाचे अभियंता येऊन पाहणी करणार आहेत. त्यामुळे ४० वर्षांपासून रखडलेल्या प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे. अधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान सुरेंद्रसिंह चंदेल यांच्यासह सरपंच शिवाजी राऊत, उपसरपंच खुशाल डोंगरवार, वामन हलाल, सायत्रा नैताम, सोनू भट्टड, क्रिष्णा पाटणकर, धोंडगे, मेश्राम, लोहंबरे, नंदेश्वर, दारगाये उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)वनकायद्यामुळे पाट बांधकामाला आली होती आडकाठीजांभुळखेडा व परिसरातील शेतीच्या सिंचनाकरिता मोठ्या सिंचन तलावाचे बांधकाम १९८० पूर्वी करण्यात आले होते. तलावाचे पाणी शेतांपर्यंत पोहोचविण्याकरिता नहराचे (पाट) बांधकाम सुरू असताना काही जागा संरक्षित वनक्षेत्रात मोडत असल्याची सबब पुढे करीत वन विभागाने सदर काम बंद पाडले होते. सदर काम आजतागायत बंदच होते. तलावाचे बांधकाम होऊनही पाटाअभावी कोणताच लाभ शेतकऱ्यांना होत नव्हता. पाटाचे बांधकाम व्हावे, याकरिता गावकऱ्यांनी अनेकदा शासनाकडे पाठपुरावा केला. त्याचबरोबर शिवसेनेच्या वतीने अनेकदा आंदोलनेही करण्यात आली. मात्र शासनाकडून आश्वासनांच्या पलीकडे काहीच प्राप्त झाले नाही.