शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

ग्रामपंचायतींची कामे ठप्प

By admin | Updated: November 19, 2016 01:59 IST

विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाभरातील ग्रामसेवकांनी ७ नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन सुरू केले होते.

ग्रामसेवकांचे आंदोलन : देसाईगंज व मुलचेरा तालुक्यातील सचिवांनी सुपूर्द केल्या चाव्यादेसाईगंज/मुलचेरा : विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी जिल्हाभरातील ग्रामसेवकांनी ७ नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाचे तीन टप्पे यापूर्वी पार पडलेत. चौथ्या टप्प्यात गुरूवारी जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी आपल्या पंचायत समितीतील बीडीओकडे आपल्या ग्रामपंचायतींच्या दप्तराच्या चाब्या सूपूर्द केल्या. त्यामुळे ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे. ग्रामसेवक युनियन तालुका शाखा देसाईगंजच्या वतीने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी उमेशचंद्र चिलबुले यांच्याकडे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या चाब्या, शिक्के व निवेदन सुपूर्द केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिवाकर निंदेकर, सचिव योगेश टिकले, कोषाध्यक्ष भोयर, सल्लागार बी. एस. राऊत, पांडुरंग पेशणे, अनिल आडे, दयाराम श्रीरामे, रवी आंबोने, कल्पना राऊत, प्रभास सिडाम, शलिनी टेंभूर्णे, बंडू उईके, खापरे, सी. एस. राऊत, लोचन शेंडे, यशोदा पेंदोर, रामटेके उपस्थित होते. ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे नागरिकांची कामे अडत असल्याने ग्रामसेवकांच्या समस्या तत्काळ सोडवाव्या, असे निवेदनात म्हटले. ग्रामसेवक युनियन शाखा मुलचेराच्या वतीने तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या कपाटाच्या चाब्या व शिक्के संवर्ग विकास अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले. गावपातळीवर सरपंचांच्या उपस्थितीत सर्व अभिलेख ग्रामपंचायतीच्या कपाटात ठेवून कुलूपबंद करण्यात आले. त्यानंतर पंचनामा व कपाटाच्या चाब्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष अनिल बंडावार, उपाध्यक्ष नंदकिशोर कुमरे, सहसचिव धर्मराव राऊत, सचिव पराग मुलकलवार हजर होते.