शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारूविक्रेत्याकडून महिलांची छेडछाड

By admin | Updated: May 30, 2014 23:41 IST

आरमोरीत दारूविक्रीचा व्यवसाय मोठय़ा तेजीत असून या अवैध धंद्याविरोधात आवाज उठविणार्‍या महिलांची छेडछाड, अतिप्रसंग व गैरवर्तन व्यावसायिकाकडून केले जात आहे. त्यामुळे महिला भयभित झाल्या

आरमोरी : आरमोरीत दारूविक्रीचा व्यवसाय मोठय़ा तेजीत असून या अवैध धंद्याविरोधात आवाज उठविणार्‍या महिलांची छेडछाड, अतिप्रसंग व गैरवर्तन व्यावसायिकाकडून केले जात आहे. त्यामुळे महिला भयभित झाल्या असून जिल्हा पोलीस अधीक्षकांना २७ मे २0१४ महिलांनी लेखी निवेदन सादर केले आहे. अवैध दारूविक्री व्यवसायाला आळा घालण्यात यावा, अन्यथा व्यवसायिकाची नागरिक धिंड काढतील, असा इशारा देण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार दूरसंचार टॉवरवस्ती तसेच वॉर्ड क्र. ५ व २ मध्ये अवैध दारूविक्रीला उधाण आले आहे. या व्यवसायावर नियंत्रण घालण्यात यावे, यासाठी नागरिक व महिलांनी पोलीस स्टेशन गाठून आपली व्यथा मांडली. परंतु पोलिसांकडून तक्रार घेण्यात आली नाही. शिवाय दारू व्यवसायिकांकडून त्यानंतर वार्डातील महिलांची छेड काढणे, अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणे किंवा गैरवर्तवणूक करून महिलांना जेरीस आणणे असे प्रकार सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा दारू पिऊन निघणारे लोक गावाजवळच्या सार्वजनिक विहिरीवर येऊन लघवी करतात, उलट्या करतात, महिलांकडे वाईट नजरेने पाहतांना दिसून येत आहे. भरदिवसा दारूची वाहतूक होत आहे. दारूची वाहने खुलेआमपणे उभे ठेवून दारूच्या पेट्याही उतरविल्या जात आहे, अशा प्रकारावर पोलिसांनी नियंत्रण न आणल्यास संबंधीत व्यक्तीची गावकर्‍यांच्या मदतीने धिंड काढण्यात येईल व होणार्‍या बेकायदेशिर कारवाईला पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा या निवेदनातून नागरिकांनी दिला आहे. पोलिसांनी सामाजिक बांधिलकेच्या दृष्टीकोनातून तत्काळ अवैधधंद्यावर आळा घालावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)