शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी थांबविली लोहदगडांची ओव्हरलोड वाहतूक

By admin | Updated: November 9, 2016 02:32 IST

एटापल्ली तालुक्यात सुरजागड पहाडीवर खासगी कंपनीकडून लोहखनिज उत्खननाचे काम सुरू झाले आहे

नगराध्यक्ष व उपाध्यक्षांची मागणी : रस्ता व वजनमापाची व्यवस्था झाल्यानंतरच वाहतूक कराएटापल्ली : एटापल्ली तालुक्यात सुरजागड पहाडीवर खासगी कंपनीकडून लोहखनिज उत्खननाचे काम सुरू झाले आहे. येथून लोहखनिजाची वाहतूकही करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतूक यामुळे सुरू झाली आहे. लोहप्रकल्प तालुक्यातच निर्माण करावा, रस्ता व वजनमापाची व्यवस्था झाल्यानंतरच येथून वाहतूक सुरू करावी, अशी मागणी एटापल्लीच्या नगराध्यक्ष सरीता राजकोंडावार, उपाध्यक्ष रमेश गंप्पावार व जनहितवादी संघटनेचे संयोजक सुरेश बारसागडे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. दरम्यान स्थानिक महिला कार्यकर्त्यांनी मंगळवारी एटापल्ली येथे आंदोलन करून लोहदगड वाहतूक करणारे ट्रक थांबविले. त्यानंतर नाक्यावर नायब तहसीलदार व्ही. एस. चव्हाण, ठाणेदार शिवाजी राऊत, पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर दळवी यांच्याशी भेटून चर्चा केली व नायब तहसीलदारांनी चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर तहसील कार्यालयात नगराध्यक्ष सरीता राजकोंडावार, उपाध्यक्ष रमेश गंप्पावार, सुरेश बारसागडे, सचिन मोतकुरवार, महेश पुल्लुरवार, सशांक नामेवार जाऊन त्यांनी तहसीलदारांशी चर्चा केली. ट्रक रोखण्याच्या आंदोलनात दीक्षा झाडे, निर्मला ओंगुलवार, मंगला आत्राम, मंजू कारपेनवार, रूपा पुसाली, विना पेरमिलवार, जनाबाई दुर्गे, विमल अगरकाटे, निर्मला गावडे, यांच्यासह जनहितवादी समिती व सुरजागड बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)