शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षातच रस्त्यावरील डांबराची झाली गिट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 05:00 IST

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २०१९ मध्ये  ८७ लाख रुपये  खर्च करून तोडसा फाटा ते आलेंगापर्यंत ३ कि.मी. रस्त्याच्या दर्जाेन्नतीचे काम करण्यात आले. माहिती फलकात काम पूर्ण झाल्याचा दिनांक २४ मे २०१९ हा आहे. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा अवधी २४ मे २०२४ पर्यंत आहे. हा कालावधी ५ वर्षांचा असला तरी अडीच वर्षांतच अर्ध्या रस्त्याचे डाबरीकरण पूर्णंत: उखडले. सध्या बारीक चुरी वर निघाली आहे.

लाेकमत न्यूज  नेटवर्क•एटापल्ली : तालुक्यात २०१९ मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काेट्यवधी रुपये खर्च करून अनेक गावांना जोडणारे रस्ते निर्माण करण्यात आले. सदर रस्त्यांचा देखभाल दुरुस्तीचा कालावधी ५ वर्षांचा आहे; परंतु एका वर्षातच डांबरी रस्त्याची दुरवस्था हाेऊन गिट्टी बाहेर पडली. त्यामुळे रस्ता बांधकामात याेग्य दर्जा राखण्यात आला काय, असा सवाल करीत बांधकामाची चाैकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २०१९ मध्ये  ८७ लाख रुपये  खर्च करून तोडसा फाटा ते आलेंगापर्यंत ३ कि.मी. रस्त्याच्या दर्जाेन्नतीचे काम करण्यात आले. माहिती फलकात काम पूर्ण झाल्याचा दिनांक २४ मे २०१९ हा आहे. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा अवधी २४ मे २०२४ पर्यंत आहे. हा कालावधी ५ वर्षांचा असला तरी अडीच वर्षांतच अर्ध्या रस्त्याचे डाबरीकरण पूर्णंत: उखडले. सध्या बारीक चुरी वर निघाली आहे. ताेडसा-आलेंगा मार्गासह तालुक्यातील इतरही रस्त्यांची लवकर दुरुस्ती करावी, तसेच रस्त्यांचा दर्जा तपासून चाैकशी करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी शासन व प्रशासनाकडे केली आहे.

या मार्गावरील अपघातास जबाबदार काेण?काही दिवसांपूर्वी एका कारचे टायर फुटून ती झाडाला आदळली. माेठा अपघात झाला; परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दुरुस्तीसाठी विशिष्ट कालावधी असतानाही रस्त्याची दुरुस्ती केली जात  नाही. परिणामी अपघात हाेतात. याला जबाबदार काेण, असा सवाल नागरिकांनी केला आहे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री अशा दाेन्ही सडक याेजना असल्या तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी नाही.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक