शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

भोई समाजाच्या समस्या सोडविणार

By admin | Updated: January 11, 2015 22:52 IST

मच्छिमार, भोई- ढिवर समाजाच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली जाईल, त्यासाठी समाजाच्या शिष्ट मंडळाला सोबत घेऊन समस्या मार्गी लावू,

मच्छिमार समाजाचा मेळावा : मार्र्कं डादेव येथे पालकमंत्र्यांचे आश्वासनचामोर्शी : मच्छिमार, भोई- ढिवर समाजाच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांशी चर्चा केली जाईल, त्यासाठी समाजाच्या शिष्ट मंडळाला सोबत घेऊन समस्या मार्गी लावू, असे आश्वासन आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिले. गडचिरोली जिल्हा भोई- ढिवर समाज बहुउद्देशीय कर्मचारी कल्याण मंडळाच्यावतीने मार्र्कं डादेव येथे आयोजित उपवर- वधू परिचय मेळाव्यात आत्राम बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, महामंडळाचे व्यवस्थापकीय संस्थापक गोकुल मवारे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, डॉ. नामदेव मेश्राम, डॉ. दिलीप शिवरकर, संवर्ग विकास अधिकारी शालिकराव धनकर, बी. जे. सातार, वन विकास महामंडळाचे साहयक व्यवस्थापक मोहन मदने, विजय पचारे, तहसीलदार दयाराम भोयर, बाबुराव बावणे, श्रीकृष्ण कावनपुरे, क्रिष्णा नागापुरे, कृष्णा मचार्लावार, नायब तहसीलदार बावणे, मंडळाधिकारी सुभाष सरपे, सरपंच ललिता म्हरसकोल्हे, माजी जि. प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, स्वप्नील वरघंटे, बंडू चिळांगे, बालाजी सोमनकर उपस्थित होते. समाजाच्यावतीने आत्राम, नेते, होळी यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान भोई- ढिवर, केवट, कहार, भनाश, बेस्ता, बेस्तालु, ओडा- ओडेवार, मच्छिमार समाजातील उपवर युवक- युवतींनी परिचय दिला. तसेच गुणवंत विद्यार्थी, संस्थांचे प्रतिनिधी, पोलीस पाटील, अंगणवाडी कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातार, काशिनाथ दुमाने, संचालन उकंड राऊत, गजानन डोंगरे यांनी केले.