शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाढलेल्या अपेक्षा पूर्ण होतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:06 IST

राज्याच्या पूर्व टोकावरील सर्वाधिक मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी पहिल्यांदा गडचिरोलीत येत आहेत.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या पूर्व टोकावरील सर्वाधिक मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री असलेले सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी पहिल्यांदा गडचिरोलीत येत आहेत. वास्तविक हा जिल्हा त्यांच्यासाठी नवीन नाही. त्यांचा गृहजिल्हा चंद्रपूरमधूनच गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याशी त्यांचे भावनिक आणि पारिवारिक ऋणानुबंध आहेत. ही बाब गडचिरोली जिल्हावासियांशी जास्त महत्वाची आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून जिल्हावासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणाºया नेत्यांमध्ये अलिकडच्या काळात स्व.आर.आर.पाटील यांचे नाव लोक अजूनही घेतात. या जिल्ह्याला खºया अर्थाने भौतिक सुविधांसह विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामे अविस्मरणीय ठरली. त्याच्यानंतरही जिल्ह्यात अनेक कामे झाली, पण त्या ताकदीची कामे दुर्दैवाने होऊ शकली नाही. जिल्ह्याच्या गरजांची जाण ठेवून मुंबईतही त्यासाठी वजन वापरत हवे ते पदरी पाडून घेण्याची आर.आर.पाटलांची तगमग वादातीत होती. सर्वसामान्यांशी नाळ जुळवून त्यांच्यापासून कायमचे दूर गेल्यानंतर असा पालकमंत्री आता होणे नाही, अशीच प्रतिक्रिया आतापर्यंत लोकांच्या तोंडून उमटत होती. पण सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा आल्यानंतर जिल्हावासियांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.विपूल वनसंपदा असूनही त्यावर आधारित रोजगार निर्मितीचा अभाव, अर्धवट स्थितीत बंद पडलेला लोहखनिज उद्योग, अतिशय धिम्या गतीने सुरू असलेली महामार्ग व इतर रस्त्यांची कामे, कित्येक वर्षांपूर्वी मंजूरी मिळूनही कामाला सुरूवात न झालेले सिंचन प्रकल्प, त्यामुळे दुबार पिकांपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक कोंडी असे कितीतरी प्रश्न या जिल्ह्याच्या विकासात अडथळा बनून उभे आहेत. पण त्याकडे राज्य सरकारच्या प्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री, वनमंत्री अशा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभळणाºया मुनगंटीवारांना या जिल्ह्याच्या प्रश्नांची बऱ्यापैकी जाणीव आहे. लालफितशाहीत अडकलेली कामे मार्गी लावण्याची त्यांची सचोटी आहे. निवडणूक आचारसंहिता लागण्याआधी त्यांना आपले काम दाखविण्यासाठी अतिशय कमी कालावधी मिळणार आहे, पण त्यातही ते आपली छाप पाडतील आणि या जिल्ह्याच्या भल्यासाठी चार गोष्टी केल्याशिवाय राहणार नाहीत, असा जिल्हावासियांचा विश्वास आहे. तो विश्वास कायम ठेवत वाढलेल्या अपेक्षा मुनगंटीवार नक्कीच पूर्ण करतील, अशी आशा करूया.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार