शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

३४ हत्या करणाऱ्या सृजनक्कासाठी बंद का पाळायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांनी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदला तीव्र विरोध केला आहे. जिल्ह्यातील नागरिक बंदला प्रतिसाद देणार नाही, हे नक्षलवाद्यांना ठाऊक असल्याने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी भ्याड नक्षलवाद्यांनी धानोरा उपविभागाअंतर्गत सावरगाव-मुरूमगाव मार्गावरील खासगी कंत्राटदाराच्या मालकीचे तीन हायवा व एक ट्रक अशा एकूण चार वाहनांची मध्यरात्रीच्या सुमारास जाळपोळ केली आहे, असेही पोलीस विभागाने म्हटले आहे.

ठळक मुद्देनिष्पाप आदिवासींचा बळी : संतप्त नागरिकांनी केली बॅनरची होळी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कसनसूर दलम डीव्हीसी सृजनक्का हिच्यावर जिल्हाभरातील विविध पोलीस ठाण्यात एकूण १४४ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून यामध्ये ३४ निष्पाप आदिवासी नागरिकांच्या खून केल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. निष्पाप आदिवासी नागरिकांच्या हत्त्येसह शासकीय मालमत्तेची जाळपोळ करणाऱ्या सृजनक्कासाठी नक्षलवाद्यांनी २० मे रोजी बंद पुकारला आहे. आदिवासींचा खून करणाऱ्या सृजनक्कासाठी हा बंद का म्हणून पाळायचा, असा सवाल जिल्ह्यातील संतप्त नागरिकांनी नक्षलवाद्यांना केला आहे.जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील नागरिकांनी नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंदला तीव्र विरोध केला आहे. जिल्ह्यातील नागरिक बंदला प्रतिसाद देणार नाही, हे नक्षलवाद्यांना ठाऊक असल्याने आपले अस्तित्व दाखविण्यासाठी भ्याड नक्षलवाद्यांनी धानोरा उपविभागाअंतर्गत सावरगाव-मुरूमगाव मार्गावरील खासगी कंत्राटदाराच्या मालकीचे तीन हायवा व एक ट्रक अशा एकूण चार वाहनांची मध्यरात्रीच्या सुमारास जाळपोळ केली आहे, असेही पोलीस विभागाने म्हटले आहे.एकीकडे राज्यासह गडचिरोली जिल्हा कोरोना संकटाचा सामना करीत असून या लढ्यात पोलिसांसोबतच सर्व विभागाचे शासकीय कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.असे असताना सुद्धा दुसरीकडे नक्षलवाद्यांना याचे काहीही सोयरसुतक नाही. नक्षलवादी बंदच्या नावाखाली नेहमीच झाडेपाडून रस्ता बंद करतात. परिणामी नागरिकांना जीवनावश्यक सेवेसोबतच आरोग्य सेवा मिळणे कठीण होते. सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊन अडचणीत आणण्याचे काम नक्षलवाद्यांकडून होत आहे, असे पोलीस विभागाने म्हटले आहे.नक्षल्यांकडून आजपर्यंत ५३३ नागरिकांची हत्यागडचिरोली जिल्ह्यात नक्षली चळवळीचा उदय झाल्यापासून आजपर्यंत नक्षलवाद्यांनी जिल्ह्यातील एकूण ५३३ सामान्य आदिवासी नागरिकांची हत्या केली. यामध्ये निष्पाप २२ महिलांचाही समावेश आहे. बंदच्या नावाखाली जनतेच्या पैशातून उभा करण्यात आलेल्या मालमत्तेची नुकसान करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न नक्षलवादी करीत असतात. बंदच्या नावाखाली वाहनांची केलेली जाळपोळ घटना ही दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी केली आहे. सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलन हंगाम सुरू आहे. तेंदूपत्ता कंत्राटदाराकडून खंडणी उकळणे हा नक्षलवाद्यांचा सदर जाळपोळ घटनेच्या माध्यमातून उद्देश असल्याचे दिसून येते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी