शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खडतर प्रवास संपणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:31 IST

तालुक्यातील वडधा परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालय गाठण्यासाठी वडधा-पोर्ला मार्गाने जावे लागते. परंतु या मार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास अत्यंत त्रासदायक ठरत आहे. दरवर्षी केवळ या मार्गाची डागडुजी केली जाते. परंतु नूतनीकरण केले जात नाही.

ठळक मुद्देवडधा-पोर्ला मार्गाची दुरवस्था : दरवर्षी उन्हाळ्यात होते केवळ डागडुजी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील वडधा परिसरातील नागरिकांना जिल्हा मुख्यालय गाठण्यासाठी वडधा-पोर्ला मार्गाने जावे लागते. परंतु या मार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गावरून प्रवास अत्यंत त्रासदायक ठरत आहे. दरवर्षी केवळ या मार्गाची डागडुजी केली जाते. परंतु नूतनीकरण केले जात नाही. त्यामुळे या मार्गावरील खडतर प्रवास संपणार कधी, असा सवाल नागरिक करीत आहेत.११ किमीचे अंतर असलेल्या या मार्गावरून पोर्लापासून वडधाकडे येत असताना सुरुवातीचा दोन किमीचा मार्ग आणि वडधाकडून पोर्लाकडे जात असताना दोन ते तीन किलोमीटरचा रस्ता सुस्थितीत आहे. मात्र मध्यंतरी जवळपास पाच ते सहा किलोमीटरचे अंतर अत्यंत खडतर आहे. या मार्गावरून प्रवास करत असताना वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या भागातील लोकप्रतिनिधी या मार्गाच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे कोणताही पुढाकार घेत नसल्याने वाहनधारकांमध्ये तीव्र रोष आहे.या मार्गाची दरवर्षी प्रशासनाकडून थातूरमातूर डागडूजी करून वेळ निभावून नेली जाते. मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. दरवर्षी या मार्गावर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र उपाययोजना पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने शासनाच्या निधीचा विल्हेवाट लावण्याचा प्रकार अवलंबिला जातो.प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. या भागातील जनतेसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. खडतर मागार्मुळे अनेक चारचाकी वाहने भंगार होत आहेत. त्यामुळे या मार्गाचे नूतनीकरण करावे, असे मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून दुचाकी चारचाकीसह मोठ्या प्रमाणात जड वाहतूक केली जाते. यादृष्टीने सदर मार्ग मजबूत असणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधींकडे सदर समस्या मांडूनही ते या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. जि.प. बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून या मार्गाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.लोकप्रतिनिधींचेही आवागमनवडधा परिसरात विविध कामानिमित्त अथवा दौºयानिमित्त बाहेरील लोकप्रतिनिधी याच मार्गाने येतात. शिवाय वडधा परिसरातील लोकप्रतिनिधी याच मार्गाने ये-जा करीत असतात. त्यांना या रस्त्याची दुरवस्था दिसून येत नाही काय, असा सवाल नागरिक करीत आहेत. लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या नूतनीकरणाचा पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा