शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना लसीकरण ठरविणार शाळा कधी सुरू हाेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:35 IST

काेराेना संसर्गाची पहिली लाट आटाेक्यात आल्यानंतर दिवाळीनंतर दाेन महिन्यांसाठी इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात भरविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ...

काेराेना संसर्गाची पहिली लाट आटाेक्यात आल्यानंतर दिवाळीनंतर दाेन महिन्यांसाठी इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात भरविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. दरम्यान, अल्पावधीतच पुन्हा काेराेना संसर्गाची दुसरी लाट आली. परिणामी सुरू झालेले हे वर्ग पुन्हा बंद पडले. विशेष म्हणजे, सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या हजाराे विद्यार्थ्यांनी शाळा वर्षभर पाहिलीच नाही. आता हे विद्यार्थी सरसकट इयत्ता दुसरीत पाेहाेचले आहेत.

बाॅक्स ....

१५ हजार विद्यार्थी थेट दुसरीत

यंदाच्या शैक्षणिक सत्रात गडचिराेली जिल्ह्याच्या सर्व शाळा मिळून ७ हजार ९५४ मुले व ७ हजार ४५४ मुली असे एकूण १५ हजार ४०८ विद्यार्थी शाळेत न जाता थेट इयत्ता दुसरीत पाेहाेचले आहेत. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेबाबत प्रचंड उत्सुकता असते. नवीन पुस्तक, नवीन सर्व साहित्य सर्व काही नवीन असल्याने प्रचंड उत्सुकता असते. मात्र, यावर्षी काेराेनाने इयत्ता पहिली ते चाैथीच्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंतच पळूच दिले नाही.

बाॅक्स ...

दुर्गम विद्यार्थी अनभिज्ञ

काेराेनामुळे प्रत्यक्ष वर्ग भरले नसले तरी इंग्रजी माध्यमांच्या शाळा, काॅन्व्हेंट तसेच मराठी शाळांनी ऑनलाईन क्लासेस सुरू केले. माेबाईल व व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया राबविण्यात आली. यात शहरी भागातील विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळविले. मात्र, ऑनलाईन प्रक्रियेशी दुर्गम भागातील विद्यार्थी फारसे जुळले नाहीत.

काेट ...

आमच्या शाळेत इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग दाेन महिने चालविण्यात आले. त्यानंतर पुन्हा काेराेनाचा संसर्ग वाढल्याने शासनाच्या आदेशानुसार वर्ग बंद पडले. खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळाच पाहिली नाही. काेराेनाचे संकट दूर हाेऊन आगामी शैक्षणिक सत्रात शाळा व वर्ग सुरळीत चालाव्या, अशी अपेक्षा आहे. - राजेंद्र घुगरे, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, नगरी.

काेट ......

माझी मुलगी इयत्ता तिसरीत असून यावर्षी चाैथीत गेल्याचे तीच सांगत आहे. काेराेना महामारीच्या समस्येमुळे यावर्षी घरी राहूनच शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार गृहपाठ केला. पुढील सत्रात तरी शाळा सुरू व्हाव्या. - पंढरी जुआरे, पालक.

काेट .....

काेराेनामुळे आम्हा विद्यार्थ्यांना वर्षभर शाळेत जाता आले नाही. परिणामी घरी बसून प्रचंड कंटाळा आला. येत्या शैक्षणिक सत्रात तरी शाळेत प्रत्यक्ष बसण्याची संधी मिळावी. तसे झाल्यास आम्ही विद्यार्थी आनंदी राहू. - वैशाली चाैधरी, विद्यार्थिनी.

काेट ......

काेराेना संकटामुळे यावर्षी जि. प. शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले. ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली असली तरी त्यात सर्व विद्यार्थी १०० टक्के सहभागी हाेऊ शकले नाहीत. काेराेना संसर्गाची समस्या पूर्णत: नष्ट झाल्यानंतर शाळा प्रत्यक्ष सुरू हाेतील. दरम्यान, आराेग्याच्या दृष्टिकाेनातून काेराेनाचे लसीकरण अतिशय महत्त्वाचे आहे. - हेमलता परसा, शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि. प. गडचिराेली.