शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुलांची उंची वाढणार केव्हा?

By admin | Updated: June 26, 2017 01:14 IST

अहेरी उपविभागातील गडअहेरी, पर्लकोटा, दिना नदीवरील पूल ठेंगणे असल्याने पावसाळ्यात अनेकदा पुलावरून पाणी वाहत असते.

दुर्लक्ष : गडअहेरी, पर्लकोटा, दिना नदीवरील वाहतूक पावसाळ्यात बंद लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : अहेरी उपविभागातील गडअहेरी, पर्लकोटा, दिना नदीवरील पूल ठेंगणे असल्याने पावसाळ्यात अनेकदा पुलावरून पाणी वाहत असते. परिणामी या भागातील जनजीवन विस्कळीत होऊन वाहतूक सलग आठवडाभर ठप्प असते. त्यामुळे तिन्ही नदीवरील पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी उपविभागातील सामाजिक संघटनांनी केली आहे. गडअहेरी नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्याने वारंवार पावसाळ्यात या भागाला फटका असत असतो. पुरामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत होऊन संपर्क तुटत असतो. जीवनावश्यक वस्तूंचाही पुरवठा या कालावधीत शेकडो गावांना होत नाही. तालुक्यातील शेकडो गावे पुरामुळे बाधित होतात. दिना नदीवरील पुलामुळे अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा तालुक्यातील वाहतुकीचे मार्ग बंद होत असतात. अशा स्थितीत सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. भामरागड येथील पर्लकोटा नदीवरील कमी उंचीच्या पुलामुळे दुर्गम भागात अनेक समस्या निर्माण होतात. या भागातील नागरिकांना या कमी उंचीच्या पुलामुळे मोठा त्रास सहन करावा लागतो. सदर तिन्ही पूल या भागातील विकासास अडसर ठरत आहे. पुलांची उंची वाढविण्याच्या मागणीसाठी वारंवार अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आंदोलने करण्यात आली. या संदर्भात यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनाही अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र शासनाने लक्ष दिले नाही. कमी उंचीच्या पुलामुळे उपविभागातील पाच तालुक्यांचा संपर्क पावसाळ्यात तुटत असतो. अनेकदा आठवडाभर गावांचा संपर्क तुटत असतो. त्यामुळे गडअहेरी, पर्लकोट, दिना नदीवरील पुलांची उंची वाढवावी, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.