शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सुसज्ज रुग्णालयाची भेट

By admin | Updated: December 31, 2014 23:23 IST

केंद्र शासनाच्या निधीतून गडचिरोली येथे २०१०-११ या वर्षात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालयाला मंजुरी मिळाली. २०१२-१३ मध्ये सुधारित प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या रूग्णालयाचे काम

नव्या वर्षात : महिला व बाल रूग्णालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यातगडचिरोली : केंद्र शासनाच्या निधीतून गडचिरोली येथे २०१०-११ या वर्षात स्वतंत्र महिला व बाल रूग्णालयाला मंजुरी मिळाली. २०१२-१३ मध्ये सुधारित प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या रूग्णालयाचे काम सुरू करण्यात आले. सध्य:स्थितीत या रूग्णालयाचे काम पूर्ण झाले असून अंतर्गत रस्ते व अतिरिक्त विद्युत जोडणीचे काम सुरू आहे. इमारतीची पेन्टींग झाली असल्याने २०१५ या नव्या वर्षात शहरवासीयांच्या सेवेत सदर सुसज्ज रूग्णालय दाखल होणार आहे. वर्षाच्या सुरूवातीलाच जनतेसाठीही अनमोल भेट असणार आहे.या रूग्णालयासाठी २६ वैद्यकीय अधिकारी व १ ते ४ चे १४८ कर्मचारी, असे एकूण १७४ कर्मचारी या रूग्णालयात आरोग्य सेवेसाठी लागणार आहेत. पहिल्या टप्प्यातील काम ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत पूर्ण झाले. गडचिरोलीच्या महिला व स्त्री रूग्णालयासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत एकूण १८ कोटी ७७ लक्ष रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदर रूग्णालयाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात खासगी कंत्राटदारांमार्फत सुरू आहे. १३ आॅगस्टपर्यंत या रूग्णालयाच्या बांधकामात दोन्ही टप्पे मिळून ९ कोटी ४० लक्ष रूपये खर्च झाले आहेत. सदर महिला व बाल रूग्णालयासाठी ३ मजल्याची इमारत उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या इमारतीत तळमजल्यावर स्वागत कक्ष, बाह्यरूग्ण विभाग, एक्स-रे कक्ष, पॅथालॉजी व ब्लडबँक, स्वयंपाकगृह तसेच मेडीकल स्टोअर्स व कार्यालय राहणार आहे. पहिल्या मजल्यावर ५ स्पेशालिस्ट डॉक्टरांचे बाह्य रूग्ण विभाग राहणार असून याच मजल्यावर दोन शस्त्रक्रिया कक्षही ठेवण्यात येणार आहे. याशिवाय ९ बेडचे प्रसुती वार्ड, ३१ बेडचे पीएमसी वार्ड, १४ बेडचे नवजात शिशू वार्ड, २४ बेडचे शस्त्रक्रिया रूग्ण वार्ड तसेच २४ बेडचे स्वतंत्र कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कक्ष राहणार आहे. दुसऱ्या मजल्यावर ३१ बेडचे प्रसुती पश्चात वार्ड, २४ बेडचा लहान मुलांचे वार्ड, ३ विशेष वार्ड आणि एका खोलीत रेकॉर्ड कक्ष राहणार आहे. शासनाच्यावतीने सदर महिला रूग्णालय १०० खाटांचे मंजूर करण्यात आले होते. मात्र सुधारित प्रस्तावात बाल रूग्णालयाचा समावेश करण्यात आल्याने या रूग्णालयातील एकूण खाटांची संख्या १३८ इतकी राहणार आहे. गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली शहरापासून ५ किमी अंतरावर आहे. या रूग्णालयात आरोग्य सेवा घेण्यासाठी शहरवासीयांना धावपळ करावी लागते. तसेच शहरात कोणत्याही शासकीय यंत्रणेमार्फत बाह्यरूग्ण विभागाची व्यवस्था नाही. यामुळे शहरातील रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागात रिघ लावावी लागते. त्यामुळे नव्यानेच सुरू होत असलेल्या स्वतंत्र महिला व बाल रूग्णालयात शहरातील रूग्णांसाठी बाह्यरूग्ण विभागाची व्यवस्था केल्यास शहरातील रूग्णांना आरोग्य सेवेसाठी सोयीचे होईल. यासाठी आरोग्य विभागाने शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे. विशेष बाब म्हणून शासनाने या रूग्णालयातहील कोणत्याही एका गाळ्यात बाह्यरूग्ण विभाग निर्माण करावा, अशी मागणी होत आहे. स्वतंत्र महिला व बाल रुग्णालयाची प्रशस्त इमारत उभारण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागला.या रुग्णालयाचे अतिरिक्त विद्युत जोडणीचे काम तसेच अंतर्गत रस्ते तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रुग्णालयातील इतर सजावटीचे काम १५ ते २० दिवसात पूर्ण होणार असून जानेवारी महिन्याच्या अखेरीसपर्यंत या प्रशस्त रुग्णालयाचे उद्घाटन उरकून घेण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)