शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडा शहरात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 01:30 IST

कुरखेडा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सती नदीवरील नळ पाणी योजनेच्या विहिरीची पातळी

टाकीची क्षमता तिप्पट : पुरवठा मात्र एक लाख लिटरचा कुरखेडा : कुरखेडा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सती नदीवरील नळ पाणी योजनेच्या विहिरीची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने ऐन उन्हाळाच्या सुरूवातीला कुरखेडा शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. नदी पात्रातून सिंचनासाठी सुरू असलेला पाण्याचा उपसा थांबविण्यात यावा, अशी मागणी कुरखेडा नगर पंचायतीचे पाणी पुरवठा सभापती रवींद्र गोटेफोडे यांनी महसूल प्रशासनाकडे केली आहे. कुरखेडा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सती नदीवरील जुन्या विहिरीच्या माध्यमातून अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागते. ही समस्या लक्षात घेऊन तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी तीन लाख लिटर क्षमतेची पाणी योजना मंजूर केली. ग्रा.पं. प्रशासनाने तीन लाख लिटर क्षमतेच्या विहिरीचे बांधकाम केले. या कामावर एक कोटीपेक्षा अधिक खर्च झाला. मात्र सदर योजना सुरूवातीपासूनच वादग्रस्त व कुचकामी ठरली आहे. तीन लाख लिटर क्षमतेची विहीर आहे. मात्र एक लाख लिटर एवढाच पाणी पुरवठा शहरात होत आहे. शहरातील १७ प्रभागांपैकी पाच प्रभागात दिवसांतून एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या सती नदीवर असलेल्या विहिरीच्या जवळ सती नदीच्या पात्रातून कुरखेडा व कुंभीटोला येथील १५ ते २० शेतकऱ्यांकडून रबी हंगामातील पिकांसाठी मोटारपंपद्वारे पाण्याचा उपसा होत आहे. परिणामी नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. एप्रिल, मे व जून महिन्याच्या कडाक्याच्या उन्हाळ्यात नदी पात्रातील पाण्याची पातळी अधिकच खालावणार आहे. त्यामुळे शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न आणखीच भीषण होणार आहे. चौकशी करणार पाणी पुरवठा सभापती गोटेफोडे यांनी तहसीलदार अजय चरडे यांची भेट घेऊन शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न त्यांच्यापुढे मांडला यावर तहसीलदार चरडे यांनी मोका चौकशी करून कायदेशीर बाबी तपासण्यात येईल. त्यानंतर कारवाई करू, असे आश्वासन त्यांनी दिले.