शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गाडी लोहार समाजाच्या कुटुंबांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:01 IST

शेती मशागतीच्या कामात यंत्राचा वापर होत असला तरी पारंपारिक साहित्याच्या माध्यमातून शेतकरी शेती मशागतीचे काम करीत आहेत. शेतीपयोगी ही अवजारे बनविणारा गाडी लोहार समाज मात्र विकासापासून कोसोदूर आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । पोटाची खळगी भरण्यासाठी आठ महिने धडपड; घनाचे घाव घालून बनवितात विविध वस्तू

सुधीर फरकाडे ।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : शेती मशागतीच्या कामात यंत्राचा वापर होत असला तरी पारंपारिक साहित्याच्या माध्यमातून शेतकरी शेती मशागतीचे काम करीत आहेत. शेतीपयोगी ही अवजारे बनविणारा गाडी लोहार समाज मात्र विकासापासून कोसोदूर आहे. तब्बल आठ महिने स्वत:चे गाव व घर सोडून उपजीविका करण्यासाठी या समाजाचे लोक गावोगावी भटकंती करीत असतात.लोखंडापासून कुºहाड, विळा, कोयता, वासला, नांगर, फासा आदीसह बैलबंडीचे साहित्य तयार करण्याचे कौशल्य गाडी लोहार समाजाच्या लोकांमध्ये आहे. मध्य प्रदेशातील गाडी लोहार (राजपूत) समाजाचे लोक गडचिरोली जिल्ह्याच्या आष्टी भागात अशाच कामासाठी दाखल झाले आहेत. लोखंडावर घनाचे घाव घालून महाराष्ट्रासह इतर राज्यात भटकंती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत.मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील शिलवानी तालुक्यातील जमेनिया या गावाचे ५०० ते ६०० कुटुंब आठ महिने उदरनिर्वाहासाठी विविध भागात भटकंती करीत आहेत. स्वत:च्या गावी केवळ चार महिने वास्तव्य केल्यानंतर इतर आठ महिने सदर समाजाच्या कुटुंबांचा संसार उघड्यावर मिळेल त्या ठिकाणी मोकळ्या जागेवर सुरू असतो. त्यांच्या जीवनातील संघर्ष कायम आहे.१०० ते ४०० रुपयांपर्यंत साहित्याचे दरगाडी लोहार बांधवांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू १०० ते ४०० रुपयांपर्यंत विकल्या जातात. कुऱ्हाडीला १०० ते २००, पावशी ८० ते १०० रुपये, विळा ६० ते १०० रुपये, कोयता १५० ते २५० रुपये, वासला १२५ ते २०० व नांगर फासा ३०० ते ४०० रुपये दराने विकले जाते. महागाईच्या युगात त्यांची मिळकत अत्यल्पच आहे.निरागस बालकेही राहतात सोबतगाडी लोहार समाजाचे अनेक कुटुंब आपले संपूर्ण बिºहाड घेऊन परराज्यात व जिल्ह्यात उदरनिर्वाहसाठी भटकंती करतात. दरम्यान त्यांच्यासोबत लहान मुले, मुलीही येतात. आपल्या आई-वडिलासोबत निरागस बालके बिºहाड असलेल्या ठिकाणी खेळत व बागळत असतात. परिणामी प्रसंगी त्यांची शाळाही बुडत असते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुढील पिढीलाही विकासासाठी फारशी संधी मिळत नाही.