शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

जागोजागी आहेत कचऱ्याचे ढीग

By admin | Updated: November 9, 2014 23:21 IST

गांधी जयंतीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या अभियानाची सुरूवात गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज रेल्वेस्थानक परिसरात खासदार अशोक नेते

देसाईगंज : गांधी जयंतीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान सुरू केले आहे. या अभियानाची सुरूवात गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज रेल्वेस्थानक परिसरात खासदार अशोक नेते व नगराध्यक्ष तसेच भाजप पदाधिकारी यांनी झाडू मारून केली मात्र सध्या देसाईगंज नगर पालिकेची स्वच्छता अभियानाविषयी उदासिनता असल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहे. ग्रामीण भागात केवळ फोटो सेशनसाठीच हे अभियान सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. स्वच्छतेकरीता केंद्रशासनापासून तर राज्य शासन देखील जनजागृती करीत असले तरी लोकसहभागामुळे अभियानाला तडा जात आहे़देसाईगंज शहरात १७ वॉर्ड आहेत. यातील अनेक वॉर्ड ग्रामीण भागातील आहेत. या शहरात कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट केली जात नाही. केवळ एक दिवस स्वच्छता अभियान राबविण्यात आले. रेल्वे स्थानकाचा परिसर झाडून फोटो सेशन कार्यक्रम झाला. त्यानंतर सारे अलबेल झाले आहे. देसाईगंज शहराच्या आरमोरी मार्गावर तर नगरपालिकेने अघोषीत डस्टयार्ड बनविले आहे़ अभियानात स्वच्छता करीत असतांना गाव स्वच्छ केले जाते. मात्र गावातील कचरा चौकात आणून ठेवला जात असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे. गावातील, शहरातील अस्वच्छता आम्ही दूर करणार असल्याची ग्वाही अभियानादरम्यान झाडू पकडतांना कार्यकर्ते देतात़ मात्र कार्यक्रम संपताच झाडू रस्त्यावर फेकला जाते.ग्रामीण भागातील हागणदारी, अस्वच्छता, गलिच्छता दुर करण्यासाठी महाराष्ट्रात तरी कठोर उपाय योजना करण्याची गरज भासत आहे़ घरी शौचालय असतांना देखील ग्रामीण भागात अजूनही उघडयावरच शौचास बसण्याच्या सवय लागलेली आहे़ शहरी तसेच ग्रामीण भागाला अशा अनेक समस्येने ग्रासले आहे़ सर्वसामान्या सोबतच नगरपालिका किंवा ग्रामपंचायत देखील अस्वच्छतेची समस्या वाढीला कारणीभुत आहेत़ स्वच्छ भारत अभियानाची जनजागृती होणे आवश्यक आहे. फोटो सेशन करण्यापेक्षा प्रत्यक्ष स्वच्छतेची जाण ठेऊन काम करण्याची गरज पर्यावरणवादी व्यक्त करीत आहे.