शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी राज्याच्या २० कोटींची प्रतीक्षा

By admin | Updated: June 19, 2014 23:49 IST

वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाच्या कामाला प्रारंभ करण्यासाठी तसेच नागपूर-नागभिड या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्याही कामाला मार्गी लावण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी गुरूवारी

गडचिरोली : वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाच्या कामाला प्रारंभ करण्यासाठी तसेच नागपूर-नागभिड या ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्याही कामाला मार्गी लावण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी गुरूवारी दक्षिण-पूर्व रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक नागभिड येथे आयोजित केली होती. या बैठकीत वडसा-गडचिरोली या बहुप्रलंबित रेल्वे मार्गाच्या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून २० कोटी रूपयाचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र राज्य सरकारच्या ५० टक्के वाट्यातील २० कोटी रूपयाचा निधी प्राप्त झाल्याशिवाय रेल्वे मार्गाचे काम सुरू करता येणार नाही, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खासदारांसह उपस्थितीत लोकप्रतिनिधींना दिली. या बैठकीत वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम त्वरित सुरू असे खासदार अशोक नेते यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर त्यांनी राज्य सरकारच्या वाट्याची रक्कम येणे आवश्यक आहे, असे सांगितले. या बैठकीला ब्रह्मपुरीचे आमदार अतुल देशकर, उमरेडचे आमदार सुधीर पारवे, गडचिरोलीचे भाजप नेते प्रमोद पिपरे, रविंद्र बानथडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, भारत बावनथडे, सुनिल नंदनवार, होमदेव मेश्राम, राजू जराते आदी उपस्थित होते. या बैठकीत नागपूर-नागभिड या ब्रॉडगेज मार्गाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, याविषयावरही चर्चा करण्यात आली. या कामात असलेल्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. त्या अडचणी केंद्र सरकारकडून मार्गी लावल्या जातील, असे खासदार नेते यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)