शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांपासून मजुरी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:02 IST

एटापल्ली नगर पंचायतीमध्ये सफाई काम करणाऱ्या २९ कामगारांची मजुरी दोन महिन्यांपासून मिळाली नाही. तसेच आपल्याला अतिशय कमी मजुरी देऊन कंत्राटदार आपली पिळवणूक करीत आहे. आठ दिवसांच्या आत मजुरी न मिळाल्यास तसेच मजुरीत वाढ न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एटापल्ली नगर पंचायतीच्या सफाई कामगारांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

ठळक मुद्देकिमान वेतन कायद्यानुसार मजुरी द्या : एटापल्ली नगर पंचायतीमधील मजूर आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली नगर पंचायतीमध्ये सफाई काम करणाऱ्या २९ कामगारांची मजुरी दोन महिन्यांपासून मिळाली नाही. तसेच आपल्याला अतिशय कमी मजुरी देऊन कंत्राटदार आपली पिळवणूक करीत आहे. आठ दिवसांच्या आत मजुरी न मिळाल्यास तसेच मजुरीत वाढ न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एटापल्ली नगर पंचायतीच्या सफाई कामगारांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.एटापल्ली नगर पंचायतीत शहराच्या स्वच्छतेचा कंत्राट श्री स्वयंरोजगार सकारी संस्था अहेरी यांना दिला आहे. या कंत्राटदाराने कंत्राटी तत्त्वावर २९ मजूर लावले आहेत. मजुरांची मजुरी बँक खात्यात जमा न करता रोकड स्वरूपात दिली जाते. किमान वेतन कायद्यानुसार महिन्याला ११ हजार ५५५ रुपये मजुरी देणे आवश्यक असताना केवळ १५० रुपये मजुरी दिली जाते. एकाही कामगाराचे पीएफ खाते काढण्यात आले नाही.दुर्गम भागात काम करणाºया रोजगार हमी योजनेच्या मजुराचे पैसे त्याच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र शहरात राहणाºया मजुरांची मजुरी रोकड स्वरूपात दिली जात आहे. यामध्ये नगर पंचायतीचे अधिकारी व कंत्राटदार यांच्यामध्ये मिलीभगत आहे, असा आरोप मजुरांनी केला आहे. नगर पंचायत कंत्राटदाराला प्रती मजूर अधिक मजुरी देते. मात्र कंत्राटदार केवळ १५० रुपये मजुरी कामगारांना देते. दिवसभर काम करणाºया कामगारांचे कंत्राटदाराकडून मोठ्या प्रमाणात शोषण होत आहे.मागील दोन महिन्यांची मजुरी मिळाली नाही. आठ दिवसांच्या आत मजुरी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सफाई कामगारांनी दिला आहे. मजुरी मिळण्यासाठी नगर पंचायत व कंत्राटदाराकडे अनेकवेळा पाठपुरावा केला. तरीही कंत्राटदाराने मजुरी दिली नाही. सफाई काम करताना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा सुद्धा पुरविल्या जात नाही, असा आरोप मजुरांनी केला आहे.पत्रकार परिषदेला अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटनेच्या उपाध्यक्ष गीता मोहुर्ले, कोमल झाडे, सुरेखा करमरकर, नानू पुनधारी, शंकर पुलारी, शिंदू सोनुले, शालू मोहुर्ले, ममता मोहुर्ले, पुष्पा ठाकरे, गीता ठाकरे, जाईबाई मोहुर्ले, वच्छला मोहुर्ले, रश्मी कोटरंगे, वैशाली वाळके हजर होते.नवीन कंत्राटातनियमानुसार सुधारणा करा२५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ८ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व विभागांना पत्र पाठवून सफाई कामगारांसाठी होणारे कंत्राट नवीन नियमानुसार लागू करावे, यामध्ये किमान कायद्यानुसार सफाई कामगारांना मजुरी देणे, बँक खात्यात मजुरी जमा करणे, ईपीएफ नियमित भरणे, कामगारांना लागू असलेल्या सोयीसुविधा पुरविणे आदींची पूर्तता करावी, असे निर्देश दिले आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानंतरही सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन महातो यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.