शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी महिलांचे वेतन थकले

By admin | Updated: December 30, 2014 23:35 IST

अंगणवाडी महिलांना राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे मानधन मागील चार महिन्यांपासून मिळाले नसून त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

गडचिरोली : अंगणवाडी महिलांना राज्य शासनाच्यावतीने दिले जाणारे मानधन मागील चार महिन्यांपासून मिळाले नसून त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. मानधनाची रक्कम तत्काळ न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी महिलांनी पेरमिली येथील मेळाव्यादरम्यान दिला आहे.अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य व केंद्रशासन मिळून मानधन देतात. राज्यशासनाच्यावतीने २ हजार रूपये तर केंद्रशासनाच्यावतीने २ हजार रूपये असे एकूण ४ हजार रूपये मानधन दिल्या जाते. केंद्राचे मानधन प्राप्त झाले आहे. मात्र राज्याकडून मिळणारे मानधन चार महिन्यांचा कालावधी लोटूनही देण्यात आले नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अत्यल्प मानधन दिले जाते. तेही मानधन वेळेवर मिळत नाही. राज्यशासनाकडून कोट्यवधींचा खर्च केला जातो. मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन देण्यासाठी शासनाकडे पैसे उपलब्ध नाहीत काय, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. पेरमिली येथे रेखा येनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे, अंगणवाडी महिला कर्मचारी लतिका दहागावकर, सत्तुबाई येनपरेड्डीवार, ललिता देवतळे, संध्या दहागावकर, काटेश्वरी मुळावार, गिरीजा दुर्गे, बेबी गावळे, शांता कोंडागुर्ले, शांता चांदेकर, जाई गावळे आदी उपस्थित होत्या. राज्यशासनाने थकलेले मानधन तत्काळ उपलब्ध करून न दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी दिला आहे. पेरमिली येथे आयोजित मेळाव्याला परिसरातील अनेक अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. दहिवडे यांनी शासनकर्ते बदलले की, सर्व काही बदलते, हा सर्वसामान्य जनतेचा गैरसमज आहे. नेता नाही तर नीती बदलण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन केले. (नगर प्रतिनिधी)