शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाने जि. प. मध्ये खाते वाटप

By admin | Updated: November 10, 2014 22:43 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेत सोमवारी नवनिर्वाचित सभापतींना खाते वाटप करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत १६ विरूद्ध ३० मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरूद्ध सर्व गटांनी एकत्र येऊन मतदान केले.

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेत सोमवारी नवनिर्वाचित सभापतींना खाते वाटप करण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. या सभेत १६ विरूद्ध ३० मतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरूद्ध सर्व गटांनी एकत्र येऊन मतदान केले. त्यानंतर अतुल गण्यारपवार यांना बांधकाम व अर्थ आणि नियोजन समितीचे सभापतिपद देण्यात आले. तर कृषी व पशुसंवर्धन समितीचा कारभार आविसचे जि. प. सदस्य अजय कंकडालवार यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.उपाध्यक्ष जीवन नाट यांना शिक्षण व आरोग्य खात्याचा कारभार सोपविण्यात आला. आज दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेत सभेला जि. प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रारंभ झाला. अध्यक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी बांधकाम व अर्थ नियोजन खाते उपाध्यक्षाकडे किंवा आविसचे अजय कंकडालवार यांच्याकडे देण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले. त्यानंतर सभागृहात मतदान घेण्यात आले. या मतदानात ३० सदस्यांनी अतुल गण्यारपवार यांना बांधकाम व अर्थ समितीचा कारभार देण्यासाठी मतदान केले. तर १६ सदस्यांनी अजय कंकडालवार यांच्या बाजूने मतदान केले. स्वत: कंकडालवार यांनीही गण्यारपवार यांच्या बाजुने मतदान केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच नाचक्की आजच्या सभेत झाली.तसेच स्थायी समितीत रिक्त झालेल्या सदस्यांच्या जागेवर काँग्रेसचे पेंटाराम तलांडी, भाजपचे डॉ. तामदेव दुधबळे व अपक्ष जगन्नाथ बोरकुटे यांची निवड करण्यात आली. बांधकाम समितीत रेखा मडावी, छाया कुंभारे यांची वर्णी लागली. शिक्षण समितीत नागेश शानगोंडा, कृषी समितीत गीता हिचामी, वित्त समितीत पेंटारामा तलांडी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीत एक जागा रिक्त राहिलेली आहे. आजच्या सभेला ५१ पैकी ४८ सदस्य उपस्थित होते. या निवडणुकीत दोन सदस्य मतदानाला तटस्थ राहिले.