शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंचा दुर्गम भागात दौरा

By admin | Updated: November 29, 2014 23:20 IST

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांनी आज शनिवारला अहेरी तालुक्यात दौरा करून तेथील महाविद्यालय व शैक्षणिक समस्या जाणून घेतल्या.

अहेरी : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित यांनी आज शनिवारला अहेरी तालुक्यात दौरा करून तेथील महाविद्यालय व शैक्षणिक समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी अहेरी शहरातील सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांशी संवाद साधला. अहेरी येथील शंकरराव बेझलवार महाविद्यालयात आयोजित चर्चासत्राच्या कार्यक्रमात अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी त्यांनी उच्च शिक्षणाच्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी बोलताना प्रभारी कुलगुरू डॉ. दीक्षित म्हणाले. सत्र परीक्षेचे नियोजन करण्यात न आल्याने सध्या सुरू असलेल्या सत्र परीक्षा घेण्यात अडचणी येत आहेत. पुढील वर्षांपासून विद्यापीठाच्यावतीने योग्य नियोजन करून १५ नोव्हेंबरपासून पहिले सेमिस्टर व एप्रिल महिन्याच्या १५ तारखेपासून दुसरे सेमिस्टर परीक्षा घेण्याचा मनोदय डॉ. दीक्षित यांनी यावेळी व्यक्त केला. दुर्गम भागात इंटरनेट सेवेचा अभाव असल्यामुळे पुढील वर्षांपासून नियोजित ठिकाणी आवेदनपत्र विद्यापीठस्तरावरून संकलीत केले जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी प्राचार्य मनोरंजन मंडल, प्राचार्य अरूण लोखंडे, मुलचेराचे प्राचार्य रणजित मंडल, प्राचार्य घुटे, प्राचार्य डॉ. भोयर, प्राचार्य विष्णू सोनावणे, प्राचार्य डॉ. लाड, प्राचार्य फुलझेले आदी उपस्थित होते. सभेचे संचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ. प्रमोद काटकर यांनी मानले. यावेळी प्राचार्यांनी समस्या मांडल्या. (तालुका प्रतिनिधी)