शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

एका डॉक्टरवर चालते पशुचिकित्सालयाचे काम

By admin | Updated: September 6, 2014 23:47 IST

पावसाळ्यात जनावरांना अनेक रोगांची लागण होण्याची शक्यता असते. यादृष्टीने ग्रामीण भागासह शहरी भागातीलही पशुवैद्यकीय दवाखाने सुसज्ज झालेले असतात. परंतु चामोर्शी येथील पशुसंवर्धन चिकित्सालयात

लोमेश बुरांडे - चामोर्शीपावसाळ्यात जनावरांना अनेक रोगांची लागण होण्याची शक्यता असते. यादृष्टीने ग्रामीण भागासह शहरी भागातीलही पशुवैद्यकीय दवाखाने सुसज्ज झालेले असतात. परंतु चामोर्शी येथील पशुसंवर्धन चिकित्सालयात कार्यरत कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. पशुचिकित्सालयाचा कारभार केवळ एका डॉक्टरवर असल्याने येथे उपचारासाठी आणल्या जाणाऱ्या अनेक जनावरांवर वेळेवर उपचार करण्यास अडचण जात आहे. पशुचिकित्सालयातील प्रणोपचारक व परिचाराचे पद रिक्त असल्याने जनावरांवर वेळीच उपचार होऊ शकत नाही. चामोर्शी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ चा आहे. जिल्हा परिषदेकडून २५ मे २००४ पासून राज्य शासनाच्या अखत्यारित या दवाखान्याचा कारभार आहे. या ठिकाणी नवीन तालुका पशुसंवर्धन, लघुपशुवैद्यकीय चिकित्सालयाचे बांधकाम अंदाजे १ कोटी २० लाखांचा निधी खर्च करून होणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर जुन्या इमारतीत सुरू असलेला पशुवैद्यकीय दवाखाना हा किसान विश्रामगृहात स्थानांतरीत होण्याच्याही चर्चा आहेत. परंतु सध्य:स्थितीत या पशुवैद्यकीय दवाखान्याची अवस्था अतिशय बिकट आहे. प्रणोपचारक व परिचरचे प्रत्येकी १ पद रिक्त असल्याने दररोज २० ते २५ जनावरांची तपासणी होत असलेल्या दवाखान्यात पशुपालकांच्या जनावरांना उपचार मिळण्यास अडचण जात आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खाडे यांच्यावर संपूर्ण दवाखान्याचा कार्यभार आहे. दवाखान्यातील सर्व कामे डॉ. खाडे पार पाडत आहेत. येथील सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्र. म. बुरले यांच्याकडे गडचिरोली येथील प्रभारी जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धनाचा प्रभार असल्याने चामोर्शी येथील पशुसंवर्धन चिकित्सालयात कर्मचाऱ्यांची वानवा आहे. परिणामी ग्रामीण भागातून उपचारासाठी आणल्या जाणाऱ्या जनावरांवर वेळीच उपचार मिळत नाही. त्यामुळे रिक्त असलेले पद त्वरित भरावे, अशी मागणी दिवाकर झलके, गितेश्वर लटारे, सुनिल कुनघाडकर, ऋषीदेव कुकडे व पशुपालकांनी केली आहे.