शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वरखडे सुपारी कट प्रकरणात आणखी दोन आरोपींवर गुन्हा दाखल

By admin | Updated: October 14, 2015 01:53 IST

महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हरीराम वरखडे यांची हत्या करण्यासाठी रचण्यात आलेल्या कटात आणखी दोन आरोपींची भर पडली आहे.

आरोपींची संख्या सात : आजी आणि माजी सचिव गुन्ह्यात सहभागीआरमोरी : महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हरीराम वरखडे यांची हत्या करण्यासाठी रचण्यात आलेल्या कटात आणखी दोन आरोपींची भर पडली आहे. राणी दुर्गावती आदिवासी विकास संस्थेचे सचिव नारायण धकाते व उमेश गजपुरे यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे पोलीस तपासात आढळून आल्यानंतर या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. या प्रकरणात यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. आता आरोपींची संख्या सात झाली आहे. राणी दुर्गावती आदिवासी विकास संस्था जोगीसाखरा या संस्थेच्या वादातून माजी आमदार हरिराम वरखडे यांना जीवे मारण्यासाठी सुपारी देण्याचा कट चंद्रपूर पोलिसांनी नांदा फाटा येथील हत्याकांडाचा तपास करताना उघडकीस आणला होता. त्यानंतर हे प्रकरण आरमोरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी मयूर गणेश मल्लेलवार, पिंटू नारायण गायधने, दिलीप राजीराम पारधी, प्रभाकर सपाटे, संतोष गोंधोळे या पाच आरोपींना अटक केली होती. त्यांची आता न्यायालयीन कोठडीत चंद्रपूर कारागृहात आहेत. याप्रकरणाचा तपास करीत असताना आरमोरीचे ठाणेदार सुभाष ढवळे यांना या प्रकरणात माजी आमदार हरिराम वरखडे यांचे निकटवर्तीय नारायण धकाते व उमेश गजपुरे यांचा सहभाग असल्याचे आढळून आले. त्यानंतर या दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. वरखडे सुपारी कटात संस्थेचे आजी व माजी दोन्ही सचिव अडकले असल्याने आरमोरीत या प्रकरणाची सध्या चर्चा रंगत आहे.वरखडे यांची हत्या करून त्यांच्या सर्व संस्था आपल्या ताब्यात घेण्याच्या उद्देशाने हा कट रचण्यात आला होता.