यावेळी साधना गण्यारपवार, निर्मला गण्यारपवार व अमोल गण्यारपवार यांनी व कुटुंबातील इतर सदस्यांनी तथा मित्र परिवारांनी त्याचबरोबर शाळेतील कर्मचारी वृंदानी केक कापून व पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये विविध जातीच्या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच बाजार समितीच्या सभागृहात रक्तदान शिबिरसुद्धा घेण्यात आले. यात शेकडो शालेय कर्मचारी वृंद व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. त्याचबरोबर नागरिकांची आरोग्य तपासणी, मोफत औषधी व चष्म्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर रुग्णालयामध्ये रुग्णांना फळांचे वाटप, विद्यार्थ्यांना शालेयपयोगी व इतर साहित्य देण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार, उपसभापती प्रेमानंद मल्लिक, संचालक निकेश गद्देवार, संचालक अमोल गण्यारपवार, पंचायत समिती सदस्य सुरेश परसोडे, माजी सरपंच मधु चिंतलवार, माजी जि. प. सदस्य राजूभाऊ आत्राम, सचिव निलेश पिंपळकर, नीरज राजकोंडावार, सूरज किरंगे, प्रकाश शिवनिवार, योगेश्वर लोळे, दशरथ वैरागडे, सुभाष कुनघाडकर, सुनील रामगोनवार, सुधाकर लटारे, प्रमोद तुरे, मंगेश राजापुरे, विजय शेंडे, अजिंक्य गण्यारपवार, कृष्णा नैताम, शिवसेना तालुकाध्यक्ष अमित यासलवार, प्पपी पठाण, सचिन लाकडे, सुधाकर गद्दे, जनार्दन सातरे, गुरुदास चुधरी, मुरलीधर बुरे, संचालक अरुण बंडावर, शामराव पोरटे, अरुण लाकडे ,साईनाथ पेशट्टीवार,मजुषा चलकलवार, व्यवस्थापक राकेश पोरटे, गोसावी सातपुते, रामचंद्र बामनकर, सतीश राॅय, सुधाकर निखाडे, शंकर वंगावार, राजेश डुमणे, सचिन चलकलवार, पंकज दहेलकर आदी कार्यकर्ते, कर्मचारी वृंद उपस्थित होते.
310821\1830-img-20210831-wa0110.jpg
विविध उपक्रम